Homeकल्चर +व्ही. विजयेंद्र प्रसाद...

व्ही. विजयेंद्र प्रसाद कथा लिहित नाहीत, तर नकळतपणे उचलतात!

मी चित्रपटाच्या कथा लिहित नाही, मी त्या इतरांच्या नकळत उचलतो. कथा तुमच्या आजूबाजूस असतातच, मग ती रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये असोत किंवा प्रत्यक्ष जीवनातील घटना असो, तुमच्या सभोवती कथा घडत असतात. तुम्ही त्या कथा तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून सादर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन बाहुबली, आरआरआर, बजरंगी भाईजान आणि मगधीरा यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहिणारे प्रख्यात पटकथाकार व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी केले.

गोवा येथे सुरू असलेल्या 53व्या इफ्फीनिमित्त ‘तज्ञ व्यक्तींची कथालेखन प्रक्रिया’ या संकल्पनेवर आधारित मास्टरक्लासमध्ये चित्रपट क्षेत्राविषयी उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांना संबोधित करताना व्ही. विजयेंद्र प्रसाद बोलत होते.

पटकथालेखनाच्या स्वतःच्या शैलीविषयी बोलताना प्रसाद म्हणाले की, ते त्यांच्या कथेत मध्यंतराच्या सुमारास एखादे अनपेक्षित वळण आणण्याचा विचार करतात आणि त्यानुसार कथेची रचना करतात. तुम्हाला शून्यातून कथा निर्माण करावी लागते. तुम्हाला खऱ्यासारखे दिसणारे खोटे जग निर्माण करावे लागते. जी व्यक्ती चांगल्याप्रकारे खोटे बोलू शकते तीच उत्तम कथाकथनकार होऊ शकते.

या मास्टरक्लासमधील एका उदयोन्मुख कथा लेखकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, कुशल कथाकार प्रसाद म्हणाले की, आपण आपल्या मनाची कवाडे सताड उघडी ठेवली पाहिजेत आणि आजूबाजूच्या प्रत्येक घडामोडीची नोंद घेतली पाहिजे. तुम्ही स्वतः तुमचे सर्वात कठोर समीक्षक असणे गरजेचे आहे. मगच तुमच्यातील सर्वोत्तम कलेचा आविष्कार होतो आणि तुम्ही तुमचे काम अमर्याद उंचीवर नेऊन ठेवू शकता.

बाहुबली तसेच आरआरआरसारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांच्या कथा लिहितानाचा अनुभव सर्वांना सांगताना ते म्हणाले की, मी कथा लिहित नाही, मी त्या सांगतो. कथेचा ओघ, त्यातील विविध पात्रे, कथेत येणारी वळणे, सगळे काही माझ्या डोक्यात असते. एका उत्तम लेखकाला दिग्दर्शक, निर्माता, प्रमुख पात्रे आणि प्रेक्षक अशा सर्वांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतात. 

प्रेक्षकांमध्ये तुमच्या कथेची भूक निर्माण करण्यामुळे तुमच्यातील सर्जकतेला चालना मिळत राहते. मी माझी कथा आणि त्यातील पात्रे यासाठी माझ्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून मला आणखी अनोखे आणि आकर्षक काम करण्याची प्रेरणा देते, असेही ते म्हणाले.

मास्टरक्लास मधील या सत्राचे सूत्रसंचालन चित्रपट समीक्षक आणि पत्रकार मयंक शेखर यांनी केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content