Sunday, September 8, 2024
Homeटॉप स्टोरी1717 उमेदवारांचे नशीब...

1717 उमेदवारांचे नशीब होणार मतदानाच्या चौथ्या टप्प्यात फायनल!

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्प्यासाठी येत्या 13 मे रोजी मतदान होत असून त्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 1717 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 96 लोकसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे, यासाठी एकूण 4264 उमेदवारीअर्ज दाखल झाले. उमेदवारीअर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2024 होती. दाखल झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी केल्यानंतर 1970 उमेदवारीअर्ज वैध ठरले.

चौथ्या टप्प्यात तेलंगणातील 17 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 1488 उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्याखालोखाल आंध्र प्रदेशातील 25 लोकसभा मतदारसंघांसाठी 1103 उमेदवारीअर्ज दाखल झाले. तेलंगणातील 7 – मलकाजगिरी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक 177 उमेदवारीअर्ज दाखल झाले. त्याखालोखाल याच राज्यातील 13 – नलगोंडा आणि 14 – भोंगीर या दोन्ही मतदारसंघांसाठी प्रत्येकी 114 उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. चौथ्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांकरीता सरासरी 18 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील

 राज्य / केंद्रशासित प्रदेशचौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची संख्याप्राप्त झालेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्याछाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्याअर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची अंतिम संख्या
आंध्र प्रदेश251103503454
बिहार51455655
जम्मू-काश्मीर1392924
झारखंड41444745
मध्य प्रदेश81549074
महाराष्ट्र11618369298
ओडिशा4753837
तेलंगणा171488625525
उत्तर प्रदेश13360138130
पश्चिम बंगाल81387575
एकूण96426419701717 

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content