Homeएनसर्कलकाश्मीरमधली 'तेहरिक-ए-हुर्रियत' बेकायदेशीर...

काश्मीरमधली ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ बेकायदेशीर घोषित!

भारत सरकारने बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA) 1967च्या कलम 3 (1) अंतर्गत ‘तेहरिक-ए-हुर्रियत, जम्मू आणि काश्मीर (TeH)’ ला ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित केले आहे.

जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी आणि इस्लामिक राजवट स्थापन करण्यासाठी ही संघटना बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी आहे. हा गट जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी भारतविरोधी प्रचार आणि सतत दहशतवादी कारवाया करत असल्याचे आढळत आहे असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत, भारतविरोधी कारवायांमध्ये सामील असलेली कोणतीही व्यक्ती किंवा संघटनेविरोधात ताबडतोब कारवाई केली जाईल, असेही शाह यांनी म्हटले आहे.

जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राजवट स्थापन करणे हे तेहरीक-ए-हुरियत, जम्मू आणि काश्मीर (TeH) चे उद्दिष्ट आहे. ही संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये फुटीरतावादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवाद आणि भारतविरोधी प्रचारात सहभागी आहे. या संघटनेची अशी कृत्ये भारताच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि अखंडतेला घातक आहेत. या संघटनेविरुद्ध बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, शस्त्रास्त्र कायदा, आरपीसी आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content