Homeटॉप स्टोरीचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू

अनेक दिवसांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सुमारे साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाचा पहिला दिवस यशस्वी केला. शासनाने दखल घेतली नाही तर, उद्या तीव्र निदर्शने आणि परवा (दि. 29 जानेवारी) एक दिवसाचा संप करण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरीत तोडगा काढावा, अन्यथा संपामुळे शासकीय यंत्रणा ठप्प होईल, असा इशारा राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला आहे.

शासनाला वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे, नाईलाजाने हा अखेरीचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दरम्यान महाराष्ट्रातील सर्व शासकीय कारभार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांशिवाय अशक्य असल्यामुळे सर्व शासकीय कामकाज ठप्प होणार असल्याने या प्रकरणी लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा, अशी मागणी राज्यातील जनतेकडून करण्यात येत आहे.

वर्ग-४ची पदे निरसित करू नयेत, दि. 14 जानेवारी, 2016 रोजीचा 25% चतुर्थश्रेणी पदे निरसित करण्याचा शासननिर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खाजगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरीत भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास त्वरीत शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयांतील चतुर्थश्रेणीची पदे सरळसेवा भरतीने त्वरीत भरावीत, ती बाह्यस्त्रोतांद्वारे भरू नयेत, वेतन त्रुटीसंदर्भात खंड-२च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, वर्षानुवर्षे कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील 925 चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून एकाच वेळी शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपाहारगृहे, वस्तू व सेवा कर उपाहारगृहे, राज्य राखीव पोलिस बलातील वर्ग-४ची पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणीची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता ती सरळसेवेने तत्काळ भरावीत, अशा विविध 25 मागण्या चतुर्थश्रेणी महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत, असे पठाण यांनी म्हटले आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content