Homeटॉप स्टोरीआजपासून राज्य सरकारचे...

आजपासून राज्य सरकारचे ‘देखो आपला महाराष्ट्र’!

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटनस्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात महाराष्ट्र अंतर्गत ‘देखो आपला महाराष्ट्र’ हे 75 सहलींचे टूर पॅकेज आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला 6 जागतिक वारसास्थळे लाभली आहेत. खरंतर आपल्या राज्यात पर्यटनस्थळांचा खजिना आहे. 900पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, 400च्या आसपास गडकिल्ले आहेत. निसर्गरम्य, सुंदर समुद्रकिनारा, व्याघ्रप्रकल्प, जैविक विविधतांनी नटलेला महाराष्ट्र, सह्याद्री पर्वतरांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन, दरी इ. सर्वांना आकर्षित करतात. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या टूरचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) 75 टूर पॅकेज सुरू केले आहे. भव्य महाराष्ट्र अंतर्गत सात सहली, आमची मुंबईमध्ये तीन सहली, हेरिटेज छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ सहली, मेस्मरायजिंग कोकणमध्ये दहा सहली, कल्चरल पुणेमध्ये सात सहली, स्पिरीचुअल नाशिकमध्ये चार सहली, मिस्टीकल अमरावतीमध्ये दोन सहली, वाईल्डलाइफ विदर्भमध्ये पाच सहली, अशा या टूर पॅकेजमधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. टूर पॅकेजेसच्या अधिक माहितीकरिता एमटीडीसीच्या चॅटबोट ९४०३८७८८६४ या क्रमांकावर फोन करू शकता किंवा टूर आरक्षित करण्यासाठी ०२२-४१५८०९०२ किंवा www.mtdc.co या संकेतस्थळाला भेट द्या. आरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आरक्षण विभाग, ०२२-४१५८०९०२ येथे संपर्क साधू शकता.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content