Homeन्यूज ॲट अ ग्लांसतत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

तत्काळ योजनेसाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असून, पात्रता मार्गदर्शक तत्त्वे कठोर आहेत. अनेक अर्जदार यापैकी एक अथवा दोन्ही निकष पूर्ण करू शकत नाहीत, यशस्वीपणे अर्ज सादर करू शकत नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी याबाबतची नियमावली आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि अपॉइंटमेंच्या दिवशी आपल्याकडे पुरेशी आणि पात्रतेचे निकष पूर्ण करणारी वैध कागदपत्रे आहेत का, याची खात्री करावी. तत्काळसाठी अपात्र ठरण्याचे निकष जाणून घेण्यासाठी या लिंकवर जावे: https://www.passportindia.gov.in/psp/TatkaalPassports (अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी पासपोर्ट कायद्यानुसार पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्जावर पुढची कार्यवाही करण्यासाठी आवश्यक वाटणारी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करायला सांगू शकते.)

तत्काळ विशेष मोहिमेत अपॉइंटमेंटसाठी अशी करा नोंदणी:

  1. पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) किंवा mPassport सेवा एपला भेट द्या आणि TATKAAL योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा.
  2. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’वर जा, ‘PSK पुणे’ हे स्थान निवडा आणि विशिष्ट तारखेसाठी अपॉइंटमेंट बुक करा.

टीप: ही मोहीम फक्त तत्काळ अपॉइंटमेंटसाठी आहे. सामान्य श्रेणीतील व्यक्तींचे अर्ज किंवा आयत्यावेळी येणाऱ्या व्यक्तींना यात परवानगी दिली जाणार नाही.

विशेष मोहिमेचा तपशील:

  1. तारीख: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
  2. स्थळ: झिरो वन, क्र.79/1, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्तीसमोर, गंगा ऑर्किड, मुंढवा, पुणे– 411036.
  3. श्रेणी: केवळ तत्काळ नियुक्त्या (नवीन आणि पुनर्निर्देशित)
  4. वेळ: सकाळी 09:00 ते संध्याकाळी 05:00 (अर्जदारांनी त्यांच्या नियोजित अपॉइंटमेंटच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी कार्यालयात पोहोचावे)

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content