Homeबॅक पेजजुडो चॅम्पियन लीग...

जुडो चॅम्पियन लीग स्पर्धेत ‘शिवनेरी किंग’ची बाजी

नाशिक जिल्हा जुडो असोसिएशनच्या वतीने आमदार राहुल डिकले मित्र विहार क्लब आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या सहकार्याने मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे तिसऱ्या जुडो चॅम्पियन लीग स्पर्धेत शिवनेरी किंग संघाने जेतेपदाचा मान मिळवला.

कॅडेट, ज्युनिअर, सिनिअर पुरुष व महिला खेळाडूंचा समावेश असलेल्या या लीगमध्ये एकूण आठ संघ होते. प्रत्येक टीममध्ये १२ खेळाडू “ऑल प्ले ऑल” होते. त्यामध्ये २९० गुण मिळवून शिवनेरी किंग अव्वल स्थानावर होते. त्यानंतर तोरणा टायगर २५० गुण, अंकाई अट्टेकर २३० गुण, देवगिरी २०० गुण. त्यामध्ये उपांत्य फेरीत शिवनेरी व अंकाई विजयी होऊन ते अंतिम फेरीत दाखल झाले. नंतर अटीतटीच्या निर्णायक सामन्यामध्ये शिवनेरी किंगने ५-० अशी बाजी मारली.

“बेस्ट जुडोका” म्हणून ओम पाटीलची निवड झाली. बालाजी ए. एस, आयुष फाळके, दर्शन गवले, सनी रानमाळ, शुभांगी राऊत, वैष्णवी पाटील, भारती सेनी, प्रणाली निंबारते, भूमी परदेशी, गंधाली या सर्व खेळाडूंनी जबरदस्त खेळ करून शिवनेरी किंगसाठी विजयश्री खेचून आणली. आदर्श शेट्टी, निखिल सुवर्णा विजेत्या संघाचे मालक होते. शेट्टी, सुवर्णा या दोघांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content