Homeडेली पल्सप्राचीन शिलाईतंत्राद्वारे बांधलेले...

प्राचीन शिलाईतंत्राद्वारे बांधलेले जहाज आजपासून नौदलाच्या सेवेत!

कारवारच्या नौदल तळावर प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेल्या जहाजाला आज भारतीय नौदलाकडून समारंभपूर्वक आपल्या ताफ्यात दाखल केले जाणार आहे. या समारंभातच या जहाजाच्या नावाचेही अनावरण होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार असून ते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. त्यांच्या हस्तेच हे जहाज औपचारिकपणे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील केले जाणार आहे.

प्राचीन शिलाईतंत्राचा वापर करून बांधलेले हे जहाज, अजिंठा लेण्यांमधील एका चित्रावरून प्रेरणा घेत साकारलेली पाचव्या शतकातील एका जहाजाची प्रतिकृती आहे. जुलै 2023मध्ये सांस्कृतिक मंत्रालय, भारतीय नौदल आणि मे. होडी इनोव्हेशन्स यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर, या प्रकल्पाची औपचारिक सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने आर्थिक पाठबळ दिले. या जहाजाच्या प्रत्यक्ष बांधणीची मुहूर्तमेढ 12 सप्टेंबर 2023 रोजी झाली. प्राचीन शिलाईतंत्राचा वापर असलेल्या या जहाजाची, संपूर्ण बांधणी पारंपरिक पद्धतीने आणि परंपरागत वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा उपयोग करूनच केली गेली आहे. केरळमधील आघाडीचे जहाजबांधणी कारागीर बाबू शंकरन यांच्या नेतृत्त्वाखालील कारागिरांच्या हजारो हातांनी शिलाईतंत्राचा वापर करून जहाजाच्या सांध्यांची बांधणी केली आहे. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये गोव्यातील मे. होडी शिपयार्डमध्ये या जहाजाचे जलावतरण केले गेले.

आज हे जहाज नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर, या प्रकल्पाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रारंभ होईल. त्याअंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने या जहाजाच्या पारंपरिक सागरी व्यापारी मार्गांवरून महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक सागरी सफरीचा प्रारंभ केला जाईल. या जहाजाच्या सागरी सफरीमुळे भारताच्या प्राचीन सागरी वाहतुकीचे युग पुन्हा जिवंत होईल. या जहाजाच्या पहिल्यावहिल्या सागरी सफरीअंतर्गत गुजरातपासून ओमानपर्यंतची आंतरमहासागरीय सफरीची तयारी नौदलाने चालवली आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content