Homeचिट चॅटत्रिंगलवाडी किल्ल्यावर वारसा...

त्रिंगलवाडी किल्ल्यावर वारसा पर्यटन व साहसी शैक्षणिक ट्रेक यशस्वी

जगप्रसिद्ध गिर्यारोहक टेन्झिंग नोर्गे शेर्पा यांच्या 112व्या जयंतीनिमित्त तसेच एव्हरेस्ट डेच्या 73व्या वर्षानिमित्त, ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी व मंदिर येथे “वारसा पर्यटन अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम” नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत MY Bharat, नाशिक कार्यालय आणि हेरिटेज साइट, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्स्पिडिशन (मार्क मार्शल आर्ट्स, नाशिकची एक शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे 3,238 फूट उंचीवर वसलेला त्रिंगलवाडी किल्ला हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. युवकांमध्ये वारसा संवर्धन, साहसी उपक्रम आणि पर्यटनाबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या एकदिवसीय ट्रेकिंग मोहिमेत 24 उत्साही ट्रेकर्सनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमास अभिलाष म्हस्के (जिल्हा युवा अधिकारी, MY Bharat, नाशिक) तसेच हसन सय्यद (पोलीस निरीक्षक, नाशिक) यांनी उपस्थित राहून सहभागींना प्रोत्साहन दिले.

या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे सहभागींची प्रेरणादायी वयोवैविध्यता. 72 वर्षीय इद्रीस अहमद खान, माजी आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद इगतपुरी, हे सर्वात ज्येष्ठ सहभागी होते. तर अदिबा खान, गोल्डन होरायझन स्कूल, नाशिक येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी, ही सर्वात लहान सहभागी ठरली. अदिबा खानने अवघ्या 5 वर्षे 3 महिन्यांच्या वयात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई सर करून विश्वविक्रम नोंदविला आहे. भारत सरकारच्या युवकांना वारसा पर्यटन, साहसी मोहिमा, नेतृत्त्वविकास आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

हा उपक्रम मोहम्मद आरिफ खान, संस्थापक- हेरिटेज साइट, कल्चरल अँड अॅडव्हेंचर एक्स्पिडिशन व मार्क मार्शल आर्ट्स, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सानिया खान (अध्यक्ष, युवा विंग, मार्क मार्शल आर्ट्स, नाशिक) यांचे सहकार्य लाभले तर अश्विन गोप कुमार यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. सहभागींनी त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी आणि मंदिर परिसराचा अभ्यास करत इतिहास, संस्कृती आणि पर्यावरणीय वारशाची माहिती घेतली. वारसा पर्यटन आणि साहसी शिक्षणाचा प्रसार करण्याच्या संकल्पासह कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

2 COMMENTS

  1. नमस्कार किरणजी,

    नाशिकच्या ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ल्यावर पार पडलेल्या ‘वारसा पर्यटन व साहसी शैक्षणिक ट्रेक’ला तुमच्या नामांकित kiranhegdelive.com या न्यूज पोर्टलवर उत्तम प्रसिद्धी दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार!

    या एकदिवसीय ट्रेकिंग मोहिमेत २४ उत्साही ट्रेकर्सनी सहभाग नोंदवून इतिहास, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. आपण या उपक्रमाची दखल घेऊन तो जनमानसांपर्यंत पोहोचवला, याबद्दल धन्यवाद. आपले सहकार्य असेच पुढेही लाभो हीच सदिच्छा!

    मोहम्मद आरिफ खान
    संस्थापक – हेरिटेज साईट, कल्चरल ॲण्ड ॲडव्हेंचर एक्स्पिडिशन
    (मार्क मार्शल आर्ट्स, नाशिक)

Comments are closed.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content