Homeकल्चर +शाहरूख खान लंडनमधल्या...

शाहरूख खान लंडनमधल्या ‘कम फॉल इन लव्ह..’च्या मंचावर

प्रसिद्ध सिनेअभिनेते शाहरुख खान याने लंडनमधील ‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी अचानक भेट दिली. १९९५मध्ये आलेल्या आणि आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेल्या हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’वर (डीडीएलजे) आधारित या संगीत नाटकाचा युके प्रीमियर येत्या २९ मे ते २१ जूनदरम्यान मँचेस्टर ओपेरा हाऊस येथे होणार आहे.

ही नवी रंगमंचीय निर्मिती युके आणि भारत या दोन पार्श्वभूमीवर आधारित असून, मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा हेच या संगीत नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘डीडीएलजे’ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक काळ चालणारा चित्रपट आहे आणि यंदा त्याला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. जेना पंड्या (सिमरनची भूमिका) म्हणाली की, शाहरुख खानची भेट होणं हे माझ्यासाठी फारच मोठं भाग्य होतं. त्याने आमच्या रिहर्सलसाठी वेळ दिला, आमचं कौतुक केलं. काही विशेष प्रसंग पाहून ती म्हणाली की, हे सर्व खूप प्रेरणादायक होतं. आता मँचेस्टरमध्ये हे नाटक सादर करण्याची मला उत्सुकता आहे. ऍशली डे (रॉजची भूमिका) म्हणाला की, त्याच्या उपस्थितीत रूममध्ये एक वेगळीच शांत ऊर्जा होती. सर्व कलाकारांशी त्याने अगत्याने संवाद साधला. ‘राज’ने ‘रॉज’ची भेट घेतली आणि हे क्षण आम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले.

संगीतकार जोडी विशाल-शेखर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. विशाल ददलानी म्हणाला की, शाहरुखने आमच्या वर्कशॉपला भेट देणं, आमच्यासाठी एक अत्यंत आनंददायक अनुभव होता. त्याने गाणी, परफॉर्मन्स आणि कलाकारांचा उत्साह यांचं खूप कौतुक केलं. त्याने प्रत्येकाशी संवाद साधला आणि त्याच्या थिएटरमधील सुरुवातीच्या काळातील आठवणीही शेअर केल्या. आम्हा सर्वांसाठी तो एक अनमोल अनुभव ठरला. शेखर रवजियानी म्हणाला की, ‘कम फॉल इन लव्ह..’च्या सेटवर शाहरुख खानची उपस्थिती ही एक अनपेक्षित आणि कायम लक्षात राहणारी गोष्ट ठरली. मूळ ‘राज’ला समोर पाहणं हे संपूर्ण टीमसाठी आनंददायक होतं. थिएटर हे शाहरुखचं पहिले प्रेम आहे आणि ते त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत होतं.

या नव्या म्युझिकलमध्ये १८ नवीन इंग्रजी गाण्यांच्या साथीने प्रेम, संस्कृती आणि कुटूंब यांची सुंदर गोष्ट रंगमंचावर सादर केली जाईल. या म्युझिकलमध्ये जेना पंड्या (भांगडा नेशन, मम्मा मिया) सिमरनच्या भूमिकेत आणि अ‍ॅश्ले डे (अन अमेरिकन इन पॅरिस, डायनेस्टी) राजच्या भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत इरविन इक्बाल (द फादर अँड द असॅसिन) बलदेवच्या भूमिकेत, कारा लेन (द अ‍ॅडम्स फॅमिली) मिंकीच्या भूमिकेत, हर्वीन मान-नेरी (बेंड इट लाइक बेकहम) लज्जोच्या भूमिकेत, अमोनिक मेलाको (ऑस्टनलँड) बेनच्या भूमिकेत, मिली ओकॉनेल (सिक्स) कुकीच्या भूमिकेत, अंकुर सभरवाल (स्नेक्स अँड लॅडर्स) अजितच्या भूमिकेत, किंशुक सेन (कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल) कुलजितच्या भूमिकेत, आणि रसेल विलकॉक्स (एग्झिट द किंग) राज सिनियरच्या भूमिकेत असतील.

कलाकारांची टीम पूर्ण करणारे एन्सेंबल सदस्य म्हणजे एरिका-जेन ऑल्डेन (ए ख्रिसमस कॅरोल: द म्युझिकल), ताश बाकारेस-हॅमिल्टन (फ्रँकी गोज टू बॉलीवूड), स्कार्लेट बेहल (सिंडरेला), सोफी कॅम्बल (सिंगिन’ इन द रेन), गॅब्रिएल कोका (फ्रोज़न: द म्युझिकल), रोहन धुपार (मम्मा मिया!), जो जॅन्गो (ऑल इंग्लंड डान्स गाला), अलेक्झांडर एमरी (लव्ह नेव्हर डाइज), कुलदीप गोस्वामी (भांगडा नेशन), एला ग्रँट (वन्स अपॉन अ टाइम टूर), यास्मिन हॅरिसन (बर्लेस्क), मोहित माथुर (बियॉन्ड बॉलीवूड), टॉम मसल (बर्लेस्क), पूर्वी परमार (लिट्ल शॉप ऑफ हॉरर्स), साज राजा (बेस्ट ऑफ एनिमीज), मनु सरस्वत (केक: द म्युझिकल), गॅरेट टेनेट (मम्मा मिया!), सोन्या वेणुगोपाल (लाईफ ऑफ पाय), आणि स्विंग्स – एमिली गुडइनफ (सनी आफ्टरनून), मरीना लॉरेन्स-माह्रा (द सीक्रेट सिल्क), जॉर्डन मैसुरिया-वेक (पीटर पॅन).

‘कम फॉल इन लव्ह – द डीडीएलजे म्युझिकल’ची वर्ल्ड प्रीमियर 2022मध्ये द ओल्ड ग्लोब, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया येथे झाली होती.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content