महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी त्यांना घडवणे, हा आहे. या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, शूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवडचाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्यपरीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
निवड चाचणी तपशील पुढीलप्रमाणे:
१) वेटलिफ्टिंग-
ठिकाण: तालुका क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे
संपर्कप्रमुख: हिमानी परब (८३६९७१६०४६)
दिनांक: ०६ एप्रिल २०२६, वेळ: सकाळी ८.०० वा.
२) लॉन टेनिस-
ठिकाण: महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, कुपरेज क्लब, मुंबई
संपर्कप्रमुख: प्रीती टेमघरे (९०२९२५०२६८)
दिनांक: ०७ एप्रिल २०२६, वेळ: सकाळी ८.०० वा.
३) शूटिंग-
ठिकाण: कामगार कल्याण मंडळ, दादर, मुंबई
संपर्कप्रमुख: नेहा साप्ते (९९६९९७२०२२)
दिनांक: ०८ एप्रिल २०२६, वेळ: सकाळी ८.०० वा.
४) टेबल टेनिस-
ठिकाण: नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळ, पनवेल
संपर्कप्रमुख: नीलकंठ आखाडे (९९६७२७७०८२)
दिनांक: ०९ एप्रिल २०२६, वेळ: सकाळी ८.०० वा.
या निवडचाचण्यांसाठी २५ वर्षांखालील खेळाडू पात्र असून, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला अनुभव आवश्यक आहे.
इच्छुक खेळाडूंनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने येत्या ३१ मार्चपर्यंत सादर करावा.
ई-मेल: missionlakshvedhamumdiv@gmail.com
अर्ज लिंक: https://forms.gle/2f7ypkikdUBKNf7fA
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३१ मार्च २०२६
अर्जासोबत जोडाः जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र. निवडचाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहवे.

