Homeडेली पल्स11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ातापर्यंत एकूण सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्जाचा भाग-1 भरून नोंदणी केली आहे. इयत्ता 11वी प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

प्रवेशप्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल चौथी फेरी, मुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शून्य फेरीत 8 ते 20 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणे, तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रदर्शित करणे, हरकती/दुरुस्ती मागण्या, सर्वसाधारण गुणवत्तायादी अंतिम करणे, विविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा देणे तसेच पहिल्या फेरीसाठी जागा प्रदर्शित करणे ही प्रक्रिया होईल. नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग-1मधली दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा असेल. कॅप फेरी-1ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मेदरम्यान होणार आहे. 26 मे रोजी प्रवेशवाटप यादी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असून, एसएमएसद्वारेही संदेश पाठविले जातील.

प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मेदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल. 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकावरही संपर्क करता येईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content