Homeटॉप स्टोरीसंजय दराडे यांची...

संजय दराडे यांची २४ तासात प्रशिक्षण विभागात झाली बदली!

राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची अवघ्या 24 तासात पुन्हा बदली करण्यात आली असून आता त्यांची नेमणूक महाराष्ट्र राज्य प्रशिक्षण व खास पथके येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

आज रात्री राज्याच्या गृह विभागाने काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या केल्या. त्यात दराडे यांची पुन्हा बदली करण्यात आली. कालच मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त दराडे यांची पुण्यात गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

पुण्याच्या गुन्हा अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश कुमार मेकला यांची वैधमापन शास्त्र विभागाचे अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील राज्य पोलीस दलाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांची प्रशिक्षण व खास पथके विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार यांची तेच पद उन्नत करून संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांची फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना यांची कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह यांची गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले निखिल गुप्ता यांची प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. वैधमापन शास्त्र विभागाचे अपर पोलीस महासंचालक व नियंत्रक रवींद्र सिंगल यांची महामार्ग सुरक्षा विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून फोर्स वनचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांची आर्थिक गुन्हे विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईचे पोलीस उपायुक्त एस. टी. राठोड यांची नागपूर शहरात दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content