मुंबईत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय तायक्वांडो स्पर्धेत खेलो तायक्वांडो अकादमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध वजनी गटांत १४ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांची, अशी एकूण ३५ पदकांची घसघशीत कमाई केली. १४ आणि १७ वर्षांखालील या दोन वयोगटांत अकादमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपल्या कौशल्याची छाप पाडली. पदकविजेत्या खेळाडूंना राजेश मुराव, कार्तिक नायडू, तुषार पाटील, स्वप्नील साळुंके, शिवानी खोले, प्रियंका परब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पदकविजेते खेळाडूः
१४ वर्षांखालील मुली- सुवर्ण: आर्या पवार, मृणाली राऊत, अवनी सुगंधी.
रौप्यः राशी विश्वकर्मा.
कांस्यः चैताली राठोड, दुर्वा शिंदे, स्वामिनी सालगावकर, आराध्या मंडल.
१४ वर्षांखालील मुले- सुवर्ण: हर्ष दळवी, ओमिश आचरेकर, अर्णव आहेर, दक्ष शेजवळ.
रौप्यः शौर्य त्यागी, आराध्य मोरे.
१७ वर्षांखालील मुलेः सुवर्णः वरद साने, वेद राऊत, जय गोस्वामी, अनुज सावंत, सार्थक चव्हाण, पार्थ मोरे.
रौप्य: विघ्नेश महाजन, यशपाल चौधरी, विवांश घोष, स्वराज सकपाळ.
कांस्यः आरुष जाधव, अर्णव शर्मा, शुभम दुधे, कार्तिक कदम, वंश सुतार, यश सिसोदिया.
१७ वर्षांखालील मुली- सुवर्णः आर्या कांबळे.
रौप्यः अस्मिता गुप्ता, आयुषी वाईंगणकर.
कांस्यः काव्या म्हात्रे, शगुन सिंग.

