Homeकल्चर +16 ऑगस्टपासून अमृत...

16 ऑगस्टपासून अमृत उद्यान पुन्हा जनतेसाठी खुले!

उद्यान उत्सव-II च्या अंतर्गत दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यान, 16 ऑगस्ट 2023 पासून एका महिन्यासाठी (सोमवार वगळता) नागरिकांसाठी खुले होणार आहे. 5 सप्टेंबर रोजी, शिक्षक दिनानिमित्त ते केवळ शिक्षकांसाठीच खुले असेल.

अभ्यागतांना, उन्हाळ्यातील वार्षिक फुलांचे दर्शन घडवून आणणे हा या उद्यान उत्सव-II चा हेतू आहे. अभ्यागत, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत (अंतिम प्रवेश दुपारी 4 वाजेपर्यंत) या उद्यानाला भेट देऊ शकतात. अभ्यागतांना उत्तर मार्गाजवळील राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वार क्रमांक 35 मधून प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी, 7 ऑगस्ट 2023 पासून राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करता येईल. थेट प्रवेशासाठी अभ्यागतांना प्रवेशद्वार क्रमांक 35 येथील सेल्फ सर्व्हिस किऑस्क (स्वयं सेवा सुविधा) च्या माध्यमातून पास मिळू शकतात. अमृत उद्यानात प्रवेश विनामूल्य आहे.

चालू वर्षी, 29 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत उद्यान उत्सव-1 अंतर्गत अमृत उद्यान खुले करण्यात आले होते त्यावेळी या उद्यानाला 10 लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली होती.

या अमृत उद्यानासोबतच, अभ्यागत राष्ट्रपती भवनाच्या (https://visit.rashtrapatibhavan.gov.in/) या संकेतस्थळावरून उपलब्ध जागा ऑनलाइन बुक करून राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतात. या उद्यान उत्सव-2 दरम्यान, सरकारी शाळांचे विद्यार्थी संग्रहालयाला मोफत भेट देऊ शकतात.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content