Homeचिट चॅटसाहित्य संमेलनाध्यक्षांना मिळावा...

साहित्य संमेलनाध्यक्षांना मिळावा ‘विशेष राज्य अतिथी’चा दर्जा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाकडून ‘विशेष राज्य अतिथी’ हा राजशिष्टाचार दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना बेडकिहाळ यांनी सांगितले की, दि. 17 व 18 जानेवारी 2023 रोजी इंदूर येथे ‘प्रांतीय मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन’ पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी म. सा. प.चे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांची निवड झाली होती. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारने प्रा. जोशी यांना जाण्या-येण्याच्या प्रवासासह इंदूर येथील वास्तव्यात ‘विशेष राज्य अतिथी’ दर्जा दिला होता. शिवाय राजशिष्टाचार म्हणून एक्सॉर्टसह वाहन, संरक्षण, निवास आदी व्यवस्था देण्यात आल्या होत्या.

मध्य प्रदेश सरकारने मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल जशी उदार भूमिका दाखवली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही यावर्षीपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी राज्य अतिथी दर्जाचा राजशिष्टाचार द्यावा. दि. 3 फेब्रुवारी रोजी वर्धा येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा करावी आणि त्याच दिवसापासून संमेलनाध्यक्षांना असा विशेष दर्जा देण्याचे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीबाबतचा ठराव नुकत्याच पुणे येथे झालेल्या म. सा. प. कार्यकारी मंडळ सभेत आपण मांडला असून तो सर्वानुमते मंजूर झाल्याची माहितीही बेडकिहाळ यांनी दिली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content