Homeटॉप स्टोरीविदर्भात भाजपाविरोधी हवा...

विदर्भात भाजपाविरोधी हवा वाहू लागली?

राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. नागपूरपाठोपाठ अमरावतीत भाजपाला पराभवाचा धक्का बसल्यामुळे विदर्भात भाजपाविरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत लिंगाडे यांना आघाडी मिळाली. त्यांनी निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला नाही. पण मते अधिक असल्याने लिंगाडे विजयी झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली. धीरज लिंगाडे पाटील यांना 46 हजार 344 मते मिळाली. तर रणजित पाटील यांना 42 हजार 962 मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे पाटील यांनी अखेर बाजी मारली.

त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील चार जागांचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले. कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे येथून विजयी झाले. त्यांना वीस हजार 748 मते मिळाली. त्यांच्याविरुद्ध उभे असलेले महाविकास आघाडीकडून शेकापचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना 9 हजार 38 मते मिळाली.

नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने थेट उमेदवार न उतरवता महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला होता. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले. त्यांना 14069 मते मिळाली. गाणार यांना 6366 मते मिळाली. येथील 90 टक्के मते जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर अडबाले यांच्याकडे गेली. याच मुद्द्यावर अनेक शिक्षक संघटनांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा एकदा निवडून आले. त्यांनी भाजपाचे किरण पाटील यांचा पराभव केला. त्यांना वीस हजार 91 मते मिळाली तर किरण पाटील यांच्याकडे 13497 मते होती.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपासमर्थित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली. त्यांना 31 हजार नऊ मते मिळाली होती तर त्यांच्याविरोधात असलेल्या महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना 16316 मते मिळाली.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content