Homeपब्लिक फिगरसध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी...

सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसीस!

४० दिवसांचा अल्टिमेटम संपूनदेखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता यापुढे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे, हे पाहावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्री यांनी सभेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शपथ घेतली. कदाचित त्यांच्याकडे मार्ग असावा. सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसीस आहे. पॉलिसी लेव्हलला ते काहीच काम करताना दिसत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

काल मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकलं. त्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन शब्द दिलेला आहे. आता या आरक्षणाबाबत ते काय निर्णय घेतात हे आपण पाहूयात. आता २४ तासांत ते काय निर्णय घेतात. कदाचित त्यांच्याकडे जादूची कांडी असावी. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. छत्रपतींची शपथ घेऊन ते सांगत आहेत तर त्यांच्याकडे कदाचित मार्ग असावा. कदाचित २४ तासांत मराठा आरक्षणाबाबत ते निर्णय घेतील असं मला  वाटतं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

चंद्रशेखर बावनकुळे जरी सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांचा दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय मावळत नाही. त्यातच सर्व उत्तर आहे. भाषणाला मुद्दे नसतानादेखील भाषण करणं ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. ज्यांना २००४मध्ये काय घडलं याचं वास्तवदेखील माहित नाही. याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ललित पाटील प्रकरणाबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा हा पराभव आहे. मी गृहमंत्र्यांवर आरोप करत नसून हे सर्व समोर दिसत आहे. या सर्व गोष्टींना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. एक नागरिक, एक लोकप्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनम्रपणे प्रश्न विचारत आहे की, ललित पाटील प्रकरणामधील नावे तुम्ही समोर आणणार होतात आणि त्यावेळी मीही शब्द दिला होता की ड्रग्जविरोधात जर तुम्ही लढाई लढणार असाल तर आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. गेले आठ ते दहा दिवस फडणवीस या सर्व प्रकरणाला टाळत आहेत, अशी टीकाही सुळे यांनी केली.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content