Homeटॉप स्टोरीअमेरिका दौऱ्यात पंतप्रधान...

अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी साधणार मॉरिसन व सुगाशीही स्वतंत्र संवाद!

कोरोनानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राषट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी एक निवेदन जारी केले. या निवेदनात ते म्हणतात-

अमेरिकेचे  अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार मी 22 ते 25 सप्टेंबरदरम्यान अमेरिका दौऱ्यावर जात आहे. माझ्या या दौऱ्यादरम्यान, अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर मी भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेणार आहे. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आम्ही आपली मते मांडू. विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचीही भेट घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह पहिल्या क्वाड लीडर्स शिखर परिषदेत मी व्यक्तिशः सहभागी होणार आहे.

यावर्षी मार्चमध्ये झालेल्या आभासी शिखर परिषदेच्या निष्कर्षांचा आढावा घेण्याची आणि हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी आमच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित भविष्यातील सहभागाला प्राधान्य देण्याची संधी या शिखर परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.

मी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सुगा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेणार असून त्या दोन्ही देशांशी असलेल्या भारताच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहे आणि प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची उपयुक्त देवाणघेवाण करणार आहे.

दौऱ्याच्या शेवटी मी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत भाषण करणार असून त्यात कोविड-19 महामारी, दहशतवादाचा सामना करण्याची गरज, हवामान बदल आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांसह जागतिक स्तरावरील आव्हानांवर माझ्या भाषणाचा भर राहील.

माझा हा अमेरिका दौरा हा अमेरिकेबरोबर व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे, जपान आणि ऑस्ट्रेलियाशी या सामरिक भागीदारांशी संबंध दृढ करणे याबरोबरच महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर आमचे सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी असेल.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content