Homeकल्चर +श्री स्वामी समर्थ यांचे...

श्री स्वामी समर्थ यांचे मूळ चरित्र ५० टक्के सवलतीत!

गिरगांव येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठास १२५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने ६ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत इ. स. १८९७ साली लिहिलेले श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांचे भक्त कै. गणेश बल्लाळ मुळेकर यांनी लिहिलेले मूळ चरित्र ५० टक्के सवलतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या सान्निध्यात राहून दैनंदिन घटनांची टाचणे करून त्याच्या आधारे लिहिलेली हे जीवन चरित्र आता त्यांचे पणतू प्रशांत केशव मुळेकर यांनी १३ व्या आवृत्तीच्या रुपाने प्रकाशित केले आहे. हे चरित्र म्हणजे स्वामी भक्तांसाठी ठेवा आहे. ते उपलब्ध होत नसल्यामुळे अखेर प्रशांत मुळेकर यांनी पुढाकार घेतला आणि त्याचे प्रकाशन केले आहे. स्वामी समर्थ यांच्या मुखातून आलेली अध्यात्म, धर्म, जीवन, भक्ति,शास्त्र, व्यवहार वगैरेसंबंधीची बोधवचने तसेच महाराजांविषयीची माहिती ठिकठिकाणांहून संकलित करून त्यांनी १८९७ साली हे गद्य जीवन चरित्र लिहिले आहे. 

या अक्कलकोट स्वामींचे वास्तव्य, अनुभविक माहिती, स्वामीभक्त चोळाप्पा, बाळाप्पा आणि श्रीस्वामीभक्तपरायण स्वामीसुत, आनंदनाथ महाराज, तातमहाराज, दादरचे श्री बाळकृष्ण महाराज आदींचीही माहिती आहे. हे पुस्तक सध्या एमॅझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या ऑनलाईन स्टोअरवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहेच. शिवाय इच्छुकांना अधिक माहितीसाठी प्रशांत मुळेकर यांच्याशी ९८६७७९९९१५, ७०२१२८६००७ वर संपर्क साधता येईल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content