Homeचिट चॅटमराठी शाळा संस्थाचालकांची...

मराठी शाळा संस्थाचालकांची रविवारी ऑनलाईन बैठक

राज्यातील मराठी शाळा टिकवायच्या असतील व गुणवत्तापूर्ण करायच्या असतील तर आधी त्या चालवणाऱ्या संस्थाचालकांच्या अडचणी काय आहेत व त्यातून कसा मार्ग काढायचा याचा विचार करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. त्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने अलीकडेच मराठी शाळा संस्थाचालक संघ ह्या कार्यगटाची स्थापना केली आहे. महाराष्ट्रातील समविचारी मराठी शाळांच्या संस्थाचालकांना सोबत घेऊन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे काम जोमाने पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मुंबई व पालघर जिल्ह्यातील मराठी शाळांच्या संस्थाचालकांची दुसरी बैठक येत्या ७ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडणार आहे.

आज मराठी शाळांच्या संस्थाचालकांना शाळा चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. “मराठी शाळांचे प्रश्न व संस्थाचालकांची भूमिका” हा बैठकीचा मुख्य विषय असून मराठी शाळांच्या संस्थाचालकांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आर्थिक, प्रशासकीय व शैक्षणिक प्रश्नांवर तसेच इतर अडचणींवर बैठकीत विचारमंथन करण्यात येणार आहे.

ही दुसरी बैठक असून यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्याही बैठका पार पडणार आहेत. मराठी अभ्यास केंद्र संलग्न, मराठी शाळा संस्थाचालक संघाच्या माध्यमातून मराठी शाळांच्या संस्थाचालकांना या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी https://marathiabhyaskendra.org.in/schools या दुव्यावर जाऊन नाव नोंदवून बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी निमंत्रक सुशील शेजुळे यांच्याशी ९६०४५२३६६६, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content