Thursday, December 12, 2024
Homeडेली पल्स'75 क्रिएटिव्ह माइंड्स...

’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’मध्ये ‘ओड’ सर्वोत्तम!

गोव्यात दिवसेंदिवस आक्रसत चाललेल्या समुद्रकिनाऱ्याबाबत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाची पकड घेणाऱ्या ‘ओड’ या लघुपटाने, गोव्यातच सुरू 54व्या इफ्फीमध्ये ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ उपक्रमात सर्वोत्तम पटाचा पुरस्कार पटकावला.

मच्छीमार समुदायातील मार्सलीन, आपली बोट ठेवण्यासाठी पार्किंगची जागा शोधण्याच्या प्रयत्नात आपली बोट शहराच्या मध्यभागी घेऊन जातो. समुद्रकिनारा चोरीला गेला आहे आणि त्याच्याकडे पार्क करण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी तक्रार तो करतो. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्यामुळे गोव्याचा आक्रसता समुद्रकिनारा, या समस्येवर ओड, हा लघुपट आहे.

विजेत्यांचे अभिनंदन करताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह सचिव (चित्रपट) आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी चित्रपट निर्मितीमध्ये खऱ्या आशयाची ओळख करून देण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यामुळे भारताला जागतिक स्तरावर लौकिक वाढेल, असे त्यांनी सांगितले. उत्तम आशय असलेले चित्रपट करण्यासाठी प्रेरित असलेल्या देशभरातील तरुण सर्जनशील व्यक्तींसाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’, हे उत्तम व्यासपीठ आहे, असे ते म्हणाले. 

’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ मधील परीक्षक सदस्य दिग्दर्शक शूजित सरकार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ‘द मिशन लाईफ’ या संकल्पनेवर 48 तासात लघुपट तयार करणे, आत्मपरीक्षण, आशा, निषेध अशा सर्व भावना संमीलित करणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्पर्धेतील सर्व लघुपटांच्या संघांचे त्यांनी अभिनंदन केले. सर्व चित्रपट खरोखरच समर्पक, विचार करायला लावणारे आणि पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन या अत्यंत महत्त्वाच्या विषयाशी संबंधित होते, असे शूजित सरकार यांनी सांगितले. ”खरे तर, तुम्ही सर्वच जण विजेते आहात.” असे कौतुक त्यांनी केले.

परीक्षक मंडळातील सदस्य आणि शॉर्ट्स टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्टर पिल्चर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तरुण सर्जनशील मनांना त्यांची प्रतिभा इतरांसमोर आणण्यासाठी ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

फिल्म चॅलेंजचा एक भाग म्हणून, ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो’ सहभागींना पाच संघांमध्ये विभागण्यात आले होते. त्यांनी 48 तासात ‘मिशन लाइफ’ या संकल्पनेवर लघुपट तयार केले. 

शॉर्ट्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने एनएफडीसीने या स्पर्धेची संकल्पना राबवली. स्पर्धेतील सहभागींनी सिनेक्षेत्रातील जागतिक अग्रणींनी आखलेल्या कार्यशाळा आणि मास्टरक्लास सत्रांनाही हजेरी लावली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम उदयाला आला असून त्याचा उद्देश चित्रपट निर्मितीच्या विविध व्यवसायातील तरुण सर्जनशील प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना अधिकाधिक ज्ञानसमृद्ध करणे, हा आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उत्सवाचा एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून 2021मध्ये सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content