Homeहेल्थ इज वेल्थआता थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना...

आता थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना मिळणार गुणवत्तापूर्ण उपचार!

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या क्षमतावाढ प्रशिक्षण, कौशल्य विकास मोहीमेला नुकतीच सुरूवात झाली आहे. रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजाराने ग्रस्त रुग्णांची योग्य काळजी घेता यावी, यासह व्यापक जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर हा पुढाकार घेण्यात आला आहे. पालिकेचे बोरिवलीतील थॅलेसेमिया उपचार केंद्र या मोहीमेसाठी माहिती केंद्र म्हणून कार्यरत आहे. यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळू शकतील.

या पुढाकाराबाबत अधिक माहिती देताना पालिकेच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, या मोहिमेसाठी इको इंडिया यांनी संयुक्त सहभाग घेतला असून शीव रूग्णालयाचे दूरस्थ (सॅटेलाईट) केंद्र असलेली प्रादेशिक प्रशिक्षण संस्था (बोरिवली) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीवर्गाची क्षमता, ज्ञान, कौशल्य विकास वाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण मोहिमेमुळे मुंबईतील थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांची काळजी अधिक चांगल्या रितीने घेणे शक्य होणार आहे. त्यासोबतच रूग्णांना प्राथमिक टप्प्यातच योग्य उपचार मिळतानाच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होईल. थॅलेसेमिया तसेच रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील पोकळी भरुन काढण्यासाठी ही मोहीम उपयुक्त असेल.

पालिकेचे कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडिएट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कॉलॉजी एण्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या संचालक (शैक्षणिक आणि संशोधन) डॉ. ममता मंगलानी म्हणाल्या की, मुंबईतील थॅलेसेमिया रूग्णांच्या नियमित तपासणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच, हेमिओग्लोबिनोपॅथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यादिशेने इको इंडियासोबतची भागीदारी रक्ताशी संबंधित दुर्मिळ आजारांनी ग्रस्त रूग्णांसाठी उपचार उपलब्धततेकरिता महत्त्वाचे पाऊल आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा पुढाकार अतिशय महत्त्वपूर्ण आहे. थॅलेसेमियाबााबत योग्य शिक्षणाने जनजागृती करा, जागरूक राहा, व्यक्त व्हा आणि काळजी घ्या, हेच यंदाच्या संकल्पनेचे उदिष्ट आहे.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर म्हणाले की, अनुवांशिक रक्ताच्या आजाराने ग्रस्त रूग्णांना उपचार देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, योग्य ज्ञान आणि आवश्यक कौशल्याच्या प्रशिक्षणामुळे रूग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या उपक्रमाला एक वेगळी संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

इको इंडियाचे सहउपाध्यक्ष डॉ. संदीप भल्ला म्हणाले की, मुंबई महापालिकेसोबत इको इंडियाची भागिदारी ही प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने थॅलेसेमिया आणि हेमोग्लोबिनोपॅथीज संसर्ग प्रतिबंध, नियंत्रण आणि रूग्णांना प्रतिकारकक्षमता वाढीसाठी चालना देणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करतानाच त्यांचे ज्ञान आणि कौशल्य विकासालाही चालना मिळणार आहे. परिणामी अनुवांशिक रक्ताचे आजार असणाऱ्या रूग्णांच्या तसेच समुदायाच्या आयुष्यमानावर याचा सकारात्मक परिणाम होण्यासाठी चालना मिळेल.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content