Homeपब्लिक फिगरनितीन गडकरींनी आतापर्यंत...

नितीन गडकरींनी आतापर्यंत दिला ४० हजार दिव्यांगाना मदतीचा हात

आपल्या महाराष्ट्रभूमीला साहित्य, संस्कृती आणि इतिहासाची मोठी देणगी आहे, अनेक संतांनी आपल्या वचनांमधून समाजातल्या वंचितांची सेवा करण्याचा संदेश दिला आहे. त्याच वचनांनुसार गेली कित्येक वर्ष आपणदेखील सामाजिक कार्यात सक्रिय असून नुकतंच आपण ४० हजार दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटप केलं. तसेच ज्यांना पाय नाहीत त्यांना कृत्रिम पाय देण्याचा उपक्रम राबवत आहोत. शोषित आणि पीडित व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

सूर्योदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिफ्टिंग ऑफ साऊंड या कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आज मुंबईत कर्णबधीर व्यक्तींना श्रवणयंत्र देण्याचा उपक्रम झाला, त्यावेळी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जन्मतः व्यंग असणाऱ्या किंवा काही आजारपणामुळे किंवा अपघातामुळे दिव्यांग झालेल्या निराधार व्यक्तींना सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सहाय्य करण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख गडकरी यांनी केला.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण लोकांचं जीवन बदलू शकतो. शोषित आणि पीडित व्यक्तींना सन्मानाने जीवन जगता यावं, त्यांना एक नवीन जीवन मिळावं यासाठी सातत्याने कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे गडकरी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला गायिका अनुराधा पौडवाल आणि संस्थेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content