Homeन्यूज ॲट अ ग्लांसबँकांना प्रादेशिक भाषेचा...

बँकांना प्रादेशिक भाषेचा वापर करण्याची नव्याने सूचना

केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बँकांमध्ये ग्राहक सेवेत प्रादेशिक भाषांचा वापर करण्याबाबत आरबीआयच्या सूचनांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. आरबीआयने शेड्यूल कमर्शियल बँकांशी संवाद साधताना, ग्राहकांना दिले जाणारे सर्व संदेश नेहमीच हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेत, असे त्रिभाषिक स्वरूपात जारी केले जावेत, पुन्हा सांगितले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

बँकांमध्ये ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रादेशिक भाषांच्या वापराबाबत सर्वसमावेशक दिशानिर्देश देण्यात आले आहेत. त्याला अनुसरून बँका प्रादेशिक गरजेनुसार आपल्या सेवा वितरणाची आखणी करू शकतात. बँकांना शाखांच्या सामान्य व्यवस्थापनासाठी बोर्डाने मंजूर केलेले धोरण स्वीकारण्याची सूचना देण्यात आली आहे. यात इतर गोष्टींबरोबरच, सर्व काउंटरवर इंडिकेटर बोर्ड लावणे, ग्राहकांना बँकेत उपलब्ध असलेल्या सेवासुविधांच्या सर्व तपशीलांसह पुस्तिका उपलब्ध करणे, किरकोळ ग्राहकांना ओपनिंग फॉर्म, पे-इन-स्लिप, पासबुक यासारखे सर्व छापील साहित्य उपलब्ध करून देणे, हिंदी, इंग्रजी आणि संबंधित प्रादेशिक भाषेत ग्राहकांसाठी साहित्याची उपलब्धता, आदींचा समावेश आहे. बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांमध्ये सहाय्य देण्यासाठी बँकांची बहुभाषिक संपर्क केंद्रे आणि डिजिटल चॅनेल उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, ग्रामीण आणि निमशहरी केंद्रांमध्ये स्थानिक ग्राहकांशी, त्यांच्या स्थानिक भाषेत प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी बँकांनी स्थानिक उमेदवारांची बँक अधिकारी म्हणून भरती करण्याचे धोरण स्वीकारावे आणि सार्वजनिक बँकांनीदेखील याचा सक्रिय पाठपुरावा करावा, अशी सूचना इंडियन बँक्स असोसिएशनने सर्व सार्वजनिक बँकांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Continue reading

समृद्ध स्वतंत्र भारत, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्वप्न

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत. या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विसाव्या शतकातले एक लोकोत्तर व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध...

‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले’ या गाण्यांचे लोकार्पण

मुंबईतल्या बोरीवली येथील स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या वतीने नुकतेच ‘दुर्गा’ आणि ‘शिवबाची मुले', या दोन मराठी गाण्यांचे लोकार्पण सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अंधेरी येथील वेदा कुणबा सभागृहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना एवढ्या मोठ्या संख्येने गायक कलाकारांना आजिवासनसारख्या...

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना किंमत शून्य…

भीमाशंकर-कर्जत येथील टोरंट पॉवरच्या 3000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी कर्जत पोलीस ग्राउंडवरील सभेतून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात काय करायचे, काय नाही, हे सगळे दिल्लीतून ठरते,...
Skip to content