Homeटॉप स्टोरी५००-१०००च्या जुन्या नोटा...

५००-१०००च्या जुन्या नोटा अजूनही बदलून मिळणार?

सोशल मीडियाच्या जमान्यात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फसवणुकीचे जाळेही विणले जाते. सध्या इंटरनेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या (बंदी घातलेल्या) नोटांबाबत मोठा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट (फेक) असून नागरिकांनी अशा कोणत्याही दाव्याला बळी पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याची पुन्हा संधी देत आहे. काही व्हिडिओंमध्ये तर या नोटा बदलण्यासाठी विशिष्ट लिंकवर क्लिक करण्यास किंवा ठराविक ठिकाणी जुन्या नोटा जमा करण्यास सांगितले जात आहे. सायबर चोरटे लोकांची दिशाभूल करण्यासाठी पीएम मोदींच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ एडिट करून किंवा एआयचा वापर करून असे बनावट व्हिडिओ तयार करत आहेत.

फसवणुकीचा ‘हा’ आहे नवा पॅटर्न

१. चुकीची माहिती: व्हिडिओमध्ये जुन्या नोटांची कायदेशीर वैधता परत आल्याचे भासवले जाते.

२. लिंकचा सापळा: व्हिडिओच्या खाली किंवा मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्याची माहिती चोरली जाऊ शकते.

३. अ‍ॅडव्हान्स फीची मागणी: काही ठिकाणी जुन्या नोटा बदलून देण्याच्या नावाखाली ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून आगाऊ पैशांची मागणी केली जाते.

पीआयबीकडून स्पष्टीकरण

पंतप्रधान कार्यालय किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी)ने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी बंद झालेल्या ५०० आणि १०००च्या नोटा आता केवळ कागदाचे तुकडे आहेत. त्या बदलून मिळण्याची कोणतीही योजना सध्या अस्तित्त्वात नाही.

फसवणुकीपासून बचाव कसा करावा?

  • अधिकृत स्त्रोत तपासा: कोणतीही आर्थिक बातमी किंवा सरकारी योजना खरी आहे की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाईट (pib.gov.in) किंवा रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.
  • लिंकवर क्लिक करू नका: व्हॉट्सॲप किंवा फेसबुकवर येणाऱ्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  • माहिती शेअर करू नका: तुमचा बँक खाते क्रमांक, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका.

एकूणच, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पूर्णपणे फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. अशा अफवा पसरवणे, हा गुन्हा आहे. त्यामुळे असा व्हिडिओ तुमच्याकडे आल्यास तो पुढे फॉरवर्ड न करता, सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार करा.

Continue reading

राज्यात पाइप गॅसच्या जोडण्यांसाठी 31 मार्चपर्यंत विविध सवलती!

जागतिक स्तरावर ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यात घरगुती पाइप गॅस (PNG) जोडण्यांचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी राज्य सरकारने गॅस कंपन्यांना दिलेल्या विविध सवलतींची मुदत 31 मार्च 2027पर्यंत वाढवली आहे. यामध्ये परवानग्या 24 तासांत देणे, काही शुल्क माफ...

उपसभापती सचिन अहिर दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

राज्य विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सध्या दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी कर्नाटक विधान भवनाला भेट दिली. कर्नाटक राज्याच्या विधान परिषद कामकाजानिमित्त आयोजित या अभ्यासदौऱ्यात उपसभापती अहिर यांनी कर्नाटक विधान परिषदेचे सभापती सलिम अहमद आणि...

महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांतल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परीक्षाशुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आतापर्यंत तब्बल २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी परीक्षाशुल्काचा एकही रुपया न भरता ‘झिरो चलन’ सुविधेद्वारे परीक्षाअर्ज दाखल केले आहेत,...
Skip to content