Homeचिट चॅटपंतप्रधान मोदींच्या ‘एक्झाम...

पंतप्रधान मोदींच्या ‘एक्झाम वॉरीयर्स’ची नवी आवृत्ती बाजारात!

विविध वर्गातले विद्यार्थी परीक्षा देण्याच्या तयारीत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरीयर्स’ पुस्तकाच्या अद्ययावत आवृत्तीची घोषणा काल केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत हे जाहीर केले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती  समृद्ध झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

नवा जोडण्यात आलेला भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा आहे. आपले युवा परीक्षा देत असल्याने त्यांना मदत करूया. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरू  झाला आहे, #ExamWarriorsची अद्ययावत आवृत्ती आता उपलब्ध आहे हे जाहीर करताना आपल्याला आनंद झाल्याचे पंतप्रधानांनी ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.

या पुस्तकात नवे मंत्र आणि अनेक मनोरंजक बाबींचाही समावेश आहे. परीक्षेआधी तणावमुक्त असण्याची आवश्यकता या पुस्तकात अधोरेखित करण्यात आली आहे. कोणतेही दडपण न घेता परीक्षेची तयारी खेळीमेळीने कशी करावी? घरी बसून परीक्षेची तयारी करताना आपण काही मनोरंजक करू शकतो का? यावर उपाय आहे..

नमो ॲपवरचे #ExamWarriosचे नवे मोड्यूल. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी अनेक संवादात्मक बाबी यामध्ये आहेत. एक्झाम वॉरीयर्सची नवी आवृत्ती, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याकडून आलेल्या मौल्यवान माहितीच्या समावेशाने समृद्ध आहे. नव्याने जोडण्यात आलेला  भाग विशेषतः पालक आणि शिक्षक यांच्या दृष्टीने मोलाचा आहे. परीक्षा देणाऱ्या आपल्या युवकांना मदत करूया! असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content