Homeएनसर्कलकान्स महोत्सवात नेहा...

कान्स महोत्सवात नेहा पेंडसेंच्या गळ्यात पेठेंचा पन्ना हार

भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिने त्यांच्या खास ब्रायडल कलेक्शनमधील पोल्की आणि पन्ना हार परिधान करून रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि भारतीय पारंपरिक कारागिरी व कालातीत सौंदर्यशास्त्राने उपस्थितांचे मन जिंकले.

नेहाच्या सौंदर्याला साजेसा असा हा हार कुशल कारागिरांनी तयार केला असून तो शाही वारशाची प्रेरणा आणि निसर्गदत्त पन्न्यांच्या ताजेपणाचा संगम दर्शवतो. पारंपरिक पोल्कीच्या मोठ्या सेटिंग्ज आणि हिरव्या पन्नाचे देखणे रंग तिच्या आधुनिक पोशाखाला एक अनोखा क्लासिक टच देत होते. हा हार तिच्या लूकला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आणि भारतीय कलाकुसरीला रेड कार्पेटवर ग्लोबल स्पॉटलाइटमध्ये आणून ठेवले. ११५ वर्षांहून अधिक काळ स्त्रियांच्या सौंदर्याला आणि आत्मविश्वासाला दागिन्यांच्या माध्यमातून साजरे करणाऱ्या पेठे ज्वेलर्सनी या ऐतिहासिक क्षणाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारतीय दागिन्यांच्या सौंदर्याची आणि परंपरेची साक्ष दिली.

Continue reading

नवरात्रीत महाराष्ट्रात होणार आरोग्याचा जागर!

नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीनटाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात...

सतीश लळीत यांना प्रतिष्ठेचा पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार

गेली २६ वर्षे सातत्याने केलेल्या कातळशिल्प संशोधनकार्याची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेने २०२६चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्येष्ठ इतिहास संशोधक पं. सेतूमाधवराव पगडी पुरस्कार कातळशिल्प संशोधक सतीश लळीत (सिंधुदूर्ग) यांना जाहीर केला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रा. नामदेव गरड आणि...

राज्य नाट्य स्पर्धेसाठी पत्रकार संघाकडून ‘ही परी अस्मानीची’!

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे यंदाच्या ६५व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘ही परी अस्मानीची’ या नाटकाची निवड करण्यात आली आहे. या नाटकाच्या नाट्यसंहितेचे पूजन लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे...
Skip to content