Sunday, April 27, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईट९ जानेवारीला राष्ट्रपतींच्या...

९ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाणार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार!

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 जाहीर केले आहेत. राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 (मंगळवार) रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकीरेड्डी सात्विक साई राज यांना प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याचा सन्मान करण्यासाठी प्रदान केले जातात. ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.

खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार खेळाडूला मागील चार वर्षांच्या कालावधीतील चांगल्या कामगिरीसाठी आणि नेतृत्व, खिलाडूवृत्ती आणि  शिस्तपालन यासाठी  दिला जातो.

उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा प्रशिक्षणात सातत्याने उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सक्षम करणाऱ्या प्रशिक्षकांना दिला जातो.

क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीने  योगदान देणाऱ्या  आणि निवृत्तीनंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत योगदान देणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. यंदा या पुरस्कारांसाठी मंजुषा कंवर, विनीत कुमार शर्मा आणि कविता सेल्वराज यांची निवड करण्यात आली आहे.

वर्ष 2023मध्ये खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यात तिरंदाज ओजस देवतळेचा समावेश आहे. आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वांगीण उत्कृष्ट  कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक दिला जातो. यंदा अमृतसरचे गुरू नानक देव विद्यापीठ या चषकाचे मानकरी ठरले आहे.

अर्ज ऑनलाईन मागवण्यात आले होते आणि खेळाडू/प्रशिक्षक/संस्था यांना समर्पित ऑनलाईन पोर्टलद्वारे स्व-अर्ज करण्याची परवानगी होती. यावर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज/नामांकने  प्राप्त झाली  होती. सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर  यांच्या अध्यक्षतेखालील निवड  समितीमध्ये  प्रख्यात खेळाडू, क्रीडा पत्रकारितेचा अनुभव असलेल्या व्यक्ती आणि क्रीडा प्रशासक यांचा समावेश होता.

समितीच्या शिफारशींच्या आधारे आणि योग्य छाननीनंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023
S. No.Name of the sportsperson*Discipline
1Shri Chirag Chandrashekhar ShettyBadminton
2Shri Rankireddy Satwik Sai RajBadminton

* दोन्ही क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

(ii) वर्ष 2023मध्ये खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारः

S. No.Name of the sportspersonDiscipline
1.  Shri Ojas Pravin DeotaleArchery
2.  Ms Aditi Gopichand SwamiArchery
3.  Shri Sreeshankar MAthletics
4.  Ms Parul ChaudharyAthletics
5.  Shri Mohameed HussamuddinBoxing
6.  Ms R VaishaliChess
7.  Shri Mohammed ShamiCricket
8.  Shri Anush AgarwallaEquestrian
9.  Ms Divyakriti SinghEquestrian Dressage
10.  Ms Diksha DagarGolf
11.  Shri Krishan Bahadur PathakHockey
12.  Ms Pukhrambam Sushila ChanuHockey
13.  Shri Pawan KumarKabaddi
14.  Ms Ritu NegiKabaddi
15.  Ms NasreenKho-Kho
16.  Ms PinkiLawn Bowls
17.  Shri Aishwary Pratap Singh TomarShooting
18.  Ms Esha SinghShooting
19.  Shri Harinder Pal Singh SandhuSquash
20.  Ms Ayhika MukherjeeTable Tennis
21.  Shri Sunil KumarWrestling
22.  Ms AntimWrestling
23.  Ms Naorem Roshibina DeviWushu
24.  Ms Sheetal DeviPara Archery
25.  Shri Illuri Ajay Kumar ReddyBlind Cricket
26.  Ms Prachi YadavPara Canoeing
  • वर्ष 2023मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

अ )  नियमित श्रेणी:

S. No.Name of the CoachDiscipline
1.  Shri Lalit KumarWrestling
2.  Shri R. B. RameshChess
3.  Shri Mahaveer Prasad SainiPara Athletics
4.  Shri Shivendra SinghHockey
5.  Shri Ganesh Prabhakar DevrukhkarMallakhamb

ब )  जीवनगौरव:

S.No.Name of the CoachDiscipline
1.  Shri Jaskirat Singh GrewalGolf
2.  Shri Bhaskaran EKabaddi
3.  Shri Jayanta Kumar PushilalTable Tennis
  • वर्ष 2023 ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार:
S. No.Name of the sportspersonDiscipline
1.  Ms Manjusha KanwarBadminton
2.  Shri Vineet Kumar SharmaHockey
3.  Ms Kavitha SelvarajKabaddi
  • मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) चषक 2023:
1Guru Nanak Dev University, AmritsarOverall winner university
2Lovely Professional University, Punjab1st runner up University
3Kurukshetra University, Kurukshetra2nd runner up University

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content