Homeएनसर्कलवैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक...

वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक डॉ. शिवाजी बंगाळ यांचे निधन


वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक डॉ. शिवाजी गणपत बंगाळ यांचे नुकतेच वृद्धापकाळाने वयाच्या ८८व्या वर्षी नाशिकच्या राहत्या घरी निधन झाले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे ते वडिल होत. अहिल्यानगर जिहयातील अकोले तालुक्यातील डॉ. शिवाजी बंगाळ हे पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर होते. काही दिवसांपूर्वी ते नाशिक येथे स्थायिक झाले होते.

प्रवरा नदीच्या तीरावर वसलेल्या मेहेेेंदुरी त्यांचे मूळ गाव. डॉ. बंगाळ यांचा जन्म 18 मार्च 1937 रोजी झाला. प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करण्याची अनेकदा संधी मिळाली. मात्र ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा हेच आपले ध्येय मानून त्यांनी आदीवासीबहुल भागात सेवाभावी वृत्तीने चार दशकांपेक्षा अधिक काळ आरोग्यसेवा केली. वैद्यकीय सेवेतील सेवाभावीवृती, सामाजिक बांधिलकी व नैतिक मूल्य कायम जपले. रुग्णांशी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श मापदंडच त्यांनी पाळला. डॉ. शिवाजी बंगाळ पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधले सन 1963च्या एम.बी.बी.एस. बॅचचे विद्यार्थी होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी परदेशातील एज्युकेशन कौन्सिल फोर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यांनी देशात सेवा देण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चोवीस वर्षे अधिकृत मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा दिली. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मानद मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले. एल.आय.सी.चे अधिकृत मेडिकल ऑफिसर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. सन 2011मध्ये रोटरी क्लबच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वक्तशीरपणा, कामातील शिस्त व सुसंस्कृता तसेच लोकांशी बांधिलकी हे त्यांचे उल्लेखनीय गुण अधोरेखित करणे गरजेचे आहे. त्यांनी ’प्रवरेचे पाणी’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहले आहे. त्यांच्या पश्चात थोरले बंधू डॉ. बाळकृष्ण बंगाळ, मुलगा दौलत बंगाळ व डॉ. राजेंद्र बंगाळ, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. 

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content