Homeकल्चर +'मंगलाष्टका रिटर्न्स'मधून उलगडणार...

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!

प्रेमकथा हा चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक आवडता विषय… त्यामुळे अनेक प्रेमकहाण्या आजवर पडद्यावर आल्या आहेत. मात्र, सुलट प्रेमाची उलट गोष्ट ही अनोखी टॅगलाइन असलेला ‘मंगलाष्टका रिटर्न्स’ हा नवा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी घटस्फोट सोहळ्याचे एक अनोखे टीजर पोस्टरही सोशल मीडियावार चांगलेच चर्चेत आले होते. आता या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.

शारदा फिल्म्स प्रोडक्शनच्या वीरकुमार शाह यांनी निर्मिती केलेल्या “मंगलाष्टका रिटर्न्स” या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश भोसले यांनी केलं आहे. डॉ. भालचंद्र यांनी कथा आणि संवादलेखन, पी. शंकरम यांनी संगीतदिग्दर्शन, विकास सिंह यांनी छायांकन, एस. विक्रमन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात वृषभ शाह, शीतल अहिरराव ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासह प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, सोनल पवार, कमलेश सावंत, सुनील गोडबोले, प्रसन्न केतकर, प्राजक्ता नवले, भक्ती चव्हाण, शीतल ओसवाल, श्वेता खरात, समीर पौलस्ते यांच्याही भूमिका आहेत.

राजकीय विरोधाची पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबातील तरुण-तरुणी एकाच कॉलेजमध्ये एकत्र येतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय घडामोडी घडत जातात याची रंजक कहाणी “मंगलाष्टका रिटर्न्स” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुलट प्रेमाची उलट गोष्ट या टॅगलाइनमुळे या गोष्टीत अनेक ट्विस्ट असणार आहेत याचा नक्कीच अंदाज बांधता येतो आहे. त्यामुळेच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरचा लुकही अगदी फ्रेश आहे. त्यामुळे ही गोष्ट अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आसतील यात शंका नाही.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content