Homeपब्लिक फिगरमहाराष्ट्र भाजपाने फुंकला...

महाराष्ट्र भाजपाने फुंकला 2029च्या निवडणुकीचा शंख!


देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या विचारधारेविषयी विश्वासाचे, सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाचा योग्य वापर करून घेण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यक्रम आखून 2029चा संपूर्ण यशाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करावे, आणि देशभक्ती, राष्ट्रीयत्व आणि विकासाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांने कामाला लावावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी केले.

पक्षाच्या 46व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सक्रिय कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष व स्थापना दिन कार्यक्रमाचे संयोजक केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, सुनील राणे, योगेश सागर, तमिल सेल्वन, पराग शाह, प्रवीण दरेकर, महापौर रितू तावडे, प्रसाद लाड आदी यावेळी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीचा आणि आगामी कार्यक्रमाचा व्यापक आढावा घेतला. पक्षाच्या कार्यपद्धतीचा सकारात्मक परिणाम समाजावर कसा होईल याचा सर्वांगीण विचार पक्ष नेहमीच करत असतो. कार्यकर्त्यानेही तसाच विचार करावा, असेही ते म्हणाले. सेवा आणि समर्पण भावनेतून पक्षाचा कार्यकर्ता काम करत राहिला, त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवेची संधी प्राप्त झाली. भाजपला अनेक निवडणुकांमध्ये मिळालेले यश प्रचंड आहे. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या पोषक समीकरण तयार करून प्रत्येक बूथची जबाबदारी घेणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी पुढच्या स्थापना दिनाआधी भक्कम करू या, असे आवाहनही त्यांनी केले.

पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता हा ‘राष्ट्राय स्वाहा’ या भावनेने काम करतो, प्रसंगी घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीत योद्धा म्हणून काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दांत राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या स्थापनाप्रसंगी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी व्यक्त केलेल्या स्वप्नाचा अभिमानास्पद उल्लेख केला. या नेत्यांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पक्षाचे असंख्य सक्रिय कार्यकर्ते, नेते, मंत्री, आमदार, नगरसेवकांच्या उत्साही उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या समारंभात प्रारंभी पक्षाच्या उभारणीसाठी समर्पित भावनेने काम करणारे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ नेते मधु चव्हाण, लद्धारामजी नागवाणी, दिलीप हजारे, अरुण मोरसावाला, शरद चव्हाण, श्रीपाद मुसळे, अविनाश दलाल आदी ज्येष्ठ कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या चित्रफितीद्वारे जनसंघ ते भाजपा या वाटचालीतील राष्ट्रसमर्पित कार्याचा पट प्रदर्शित करण्यात आला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content