Homeकल्चर +क्रियेशन कराओके क्लबच्या...

क्रियेशन कराओके क्लबच्या स्पर्धेत माधवी पाटील विजेत्या!

क्रियेशन कराओके क्लबच्या वतीने मुंबईत गोरेगावच्या प्रज्ञाबोधिनी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धेत माधवी पाटील यांनी पहिले पारितोषिक पटकावले. रेश्मा धोत्रे यांना दुसरे तर पूर्वा पाठक यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी तसेच स्वाती परब यांना चौथे उत्तेजनार्थ पारितोषिक विभागून देण्यात आले.

या स्पर्धेच्या वेळी साधारण १२५ लोक उपस्थित होते. त्यापैकी ६२ जणांनी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेसाठी काही नियम निश्चित करण्यात आले होते. यामध्ये गायकांचा क्रम सोडतीने ठरवला गेला होता. स्टेजवर गेल्यावर गायक त्याचे नाव आणि क्रमांक माईकवरून समोर बसलेल्या परीक्षकांना सांगायचा. गायक गाण्याचे बोल माईकवरून सांगायचा आणि त्याप्रमाणे समोरील मॉनिटरवर तो कराओके ट्रॅक यायचा. गायकाने गाण्याचा मुखडा आणि दोन अंतरे गायचे. त्यानंतर ट्रॅक बंद करण्यात यायचा. परीक्षक सूर, ताल, लय, भाव आणि सादरीकरण यांना अनुक्रमे १० गुणांपैकी गुण द्यायचे. अशी एकंदर ५० गुणांची ही स्पर्धा होती. भूषण सामंत, पंडित युधामन्यू गद्रे आणि गोपाळ सावंत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी याकरीता सलग पाच ते साडेपाच तास काम पाहिले.

कराओके

प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माधवी पाटील यांचं गाणं ऐकल्यानंतर परीक्षक काय निर्णय देतील तो निर्णय आधीच तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी लावला होता आणि सर्वांनीच पहिला क्रमांक ठरवूनही टाकला होता. कारण, त्यांचं गाणंच तसं झालं होतं. माधवींची मेहनत अफलातून तर होतीच, गाणं त्याहून सुंदर होतं आणि मुख्य म्हणजे ते गाणं गायला फार कठीण होतं.

कराओके

रेश्मा धोत्रे यांचं गाणं तर काही विचारायला नकोच. खूपच छान झालं. त्यांचा क्रमांक दुसरा आला. नियमित हसतमुख असणाऱ्या पूर्वा पाठक यांनी अक्षरशः त्या काळाची आठवण करून दिली. ज्यावेळेस तो सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा सर्वांच्या मुखात ते गाणं कायमच असायचं. त्यांना तिसरे बक्षिस मिळाले. कमल जोशी, स्वाती परब या कराओके क्लबचे सदस्यच आहेत. त्यांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.

कराओके

अरविंद परुळेकर यांनी क्रियेशन कराओके क्लब १७ जून २०१३ साली चालू केला. अगदी कोरोना काळातही या क्लबचे कार्य चालूच राहिले. आज दहा वर्षांनंतरही या क्लबचे कार्य जोमाने चालूच आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content