Homeचिट चॅटभगवान महावीरांच्या विचारांच्या...

भगवान महावीरांच्या विचारांच्या प्रचार समितीत ललित गांधी

संपूर्ण विश्‍वाला शांति, अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24वे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण दिनाला 2550 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भगवान महावीरांचे विचार व कार्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

वर्षभर ही समिती संपूर्ण महाराष्ट्रात भगवान महावीर यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. शिक्षण संचालक (माध्यमिक), सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती, पवन सिंघवी, हितेश मोता, सुरेंद्र शाह, नितीन वोरा, डॉ. के. एस. गंगवाल यांचा या समितीत समावेश आहे.

भगवान महावीरांच्या 2550व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचे आयोजन हे या समितीचे मुख्य विषय असतील असे ललित गांधी यांनी सांगितले. वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व गाव स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील, असेही ते म्हणाले.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content