Homeडेली पल्सअवघ्या ३ महिन्यांतच...

अवघ्या ३ महिन्यांतच नितीश कुमार यांचा बिहारला बायबाय?

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दहाव्यांदा शपथ घेणारे नितीश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. येत्या १६ मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते राज्यसभेवर जाण्याची शक्यता असून त्यांचे पुत्र निशांत कुमार बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होतील तर मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीच्या चेहऱ्याची वर्णी लागू शकते.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणुकांना सामोरे जात घवघवीत यश मिळवले. या निवडणुकीच्या वेळेपासूनच नितीश कुमार यांच्या आजारपणाची चर्चा होती. ७५ वर्षीय नितीश कुमार यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. त्याचवेळी ते आपले पुत्र निशांत कुमार यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे आणतील, अशी अटकळ होती. परंतु घराणेशाहीला नैतिकदृष्ट्या विरोध करण्याच्या प्रयत्नात हे झाले नाही. भाजपानेही आपण नितीश कुमार यांच्याकडील मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचा आरोप टाळण्यासाठी नितीश कुमार यांनाच बिहारच्या मुख्यमंत्रीपदी बसवले. २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांचा आजार दिवसेंदिवस बळावत आहे. त्यामुळे आज सकाळी भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पाटण्यात नितीश कुमार यांची भेट घेत त्यांना राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिला. बिहारचे मुख्यमंत्रीपद तुमच्या जनता दल युनायटेड पक्षाकडेच राहू द्यावे, जदयुच्या भवितव्याकरीता आपण मुलगा निशांत कुमार यांना राजकारणात सक्रीय करावे, असा सल्ला नितीन नवीन यांनी दिल्याचे कळते.

त्यानंतर, नितीश कुमार यांनी आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेते लल्लन सिंह, संजय झा, मंत्री श्रवण कुमार आदींशी दीर्घ चर्चा केली. नितीश कुमार कुशवाह समाजाचे आहेत. या समाजावर असलेली पक्षाची पकड टिकवून ठेवायची असेल तर त्यांनी आताच निशांत कुमार यांना राजकारणात आणावे. बिहार सरकारमध्ये त्यांचा समावेश करावा, पक्षाच्या संघटनेतही महत्त्वाचे पद द्यावे, यावर सर्वांचे एकमत झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी उद्या उमेदवारीअर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या नितीश कुमार आपला राज्यसभेचा उमेदवारीअर्ज दाखल करतील, असे समजते. निशांत कुमार नवखे असल्यामुळे त्यांना थेट मुख्यमंत्रीपदी बसवले जाणार नाही. त्यामुळे जदयुमधली गटबाजी उफाळू शकते. त्यामुळेच निशांत कुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवून भाजपा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content