Homeन्यूज अँड व्ह्यूजमुंग्यांनी मेरू पर्वत...

मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना?

मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? काल सकाळी वर्तमानपत्रे आली आणि आश्चर्याचा धक्काच बसला की हो! ‘सामना’ वर्तमानपत्रात राज्य सरकारची चक्क पानभर जाहिरात आणि तीही पहिल्या पानावर!! अलीकडच्या काळात सरकारी जाहिराती सामनाला मिळत होत्या. नाही असं नाही. पण त्या आतील पानावर व अर्ध्यामुरड्या पानभर. मग जाहिरातीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहिला आणि त्यांचे गेल्या निवडणूक प्रचारातील एक वाक्य आठवले ‘उद्धव यांना मी केव्हाही फोन करू शकतो’.. (एक फोन की दूरी है..)

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्त देखरेखीखालील माहिती खात्याने ही जाहिरात दिलेली असल्याने आता समजा याची चौकशी करायची झाली तर नेमका ठपका कुणावर ठेवला जाईल याबाबत शंकाच आहे. असो.  जाहिरातीतील हा प्रकल्प शिवसेना सत्तेत असताना मुंबई महापालिकेने अंमलात आणायला सुरुवात केली होती. हेही कारण असावे किंवा ‘मनभेद’ मिटानेकी कोशिश भी हो सकती है.. असे धूर्त कारणही एका भाजपायीने दिले. हे कारण ऐकून मला येणारे हसू मी दाबून ठेवले.. का ते मात्र समजत नाही!

Continue reading

पूर्णेकर हत्त्येमागे भलताच अँगल?

ठाणे शहरातील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप तथा बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्त्येस एक महिना उलटून गेल्यानंतरही सूत्रधार मिळत नसल्याने ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नाटक रंगत आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. राजकीय नाटक, या...

बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे दिल्लीतले अधिकारीही वैतागले!

आठ दिवसांपूर्वी रविवारी रात्री मुंबईत जुहूच्या पुष्पा पार्कजवळ प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफवर बिष्णोई गँगच्या गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबाराने मुंबई पोलीस सोडा, खुद्द केंद्रीय गृह मंत्रालयातील काही बडे अधिकारी संतापाने लालबुंद झाल्याची माहिती हाती आली आहे. खरंतर बिष्णोई गँगच्या कारवायांमुळे...

तळहाताला खाज सुटली आणि टायगरजवळ फुटले फटाके!

वर्षभरापूर्वी जुहूच्या मेहमूद चौकातील रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर लॉरेन्स बिष्णोईच्या गुंडानी अंदाधुंद गोळीबार केला होता व अवघ्या पाच मिनिटात तो समाजमाध्यमावर प्रसारितही केला गेला होता. अगदी तीच पद्धत काल रात्रीही पुष्पा पार्क येथे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा,...
Skip to content