Homeकल्चर +युवा उद्योजकांमुळे भारत...

युवा उद्योजकांमुळे भारत लवकरच जगातील तिसरी आर्थिक महासत्ता!

पूर्वी उद्योगांना परवानग्यांसाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागे. परंतु आज व्यापार सुलभीकरणामुळे उद्योग-व्यवसाय करणे सोपे झाले आहे. देशात तसेच राज्यात अनेक स्टार्टअप व युनिकॉर्न कंपन्या निर्माण होत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये तेजीने होत असलेली प्रगती पाहता, देशातील युवा उद्योजक भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.

दत्ता जोशी लिखित ‘मूव्हिंग ऍस्पिरेशन्स’ – नेक्स्टजेनच्या २५ परिणामकारक कथा’ या मराठी व इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन आज राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायात उतरलेल्या दुसऱ्या पिढीतील २५ युवा उद्योजकांच्या व्यवसाय यशोगाथा देण्यात आल्या आहेत.

प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती राम भोगले, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, सातारा येथील कवित्सु रोबोट्रॉनिकसचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ फडतरे, तसेच पुस्तकामध्ये नमूद केलेले नव्या पिढीतील युवा उद्योजक उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या विविध भागात कौटुंबिक व्यवसायांमध्ये दुसऱ्या पिढीतील युवक-युवती नवनव्या संकल्पना घेऊन आले आहेत. हे युवक-युवती उच्च विद्याविभूषित असून त्यांना जागतिक व्यापार प्रवाहांची माहिती आहे. या युवा उद्योजकांच्या यशोगाथा वाचून शंभरपैकी दहा युवकांनी प्रेरणा घेतली तरी त्याचा त्यांना व राज्याला फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्राला गरवारे, जैन, किर्लोस्कर अश्या अनेक औद्योगिक घराण्यांची परंपरा आहे. या कौटुंबिक उद्योगांमधील पुढची पुढे त्यांचे व्यवसाय जोमाने पुढे नेत आहेत. आज डिजिटल क्षेत्र तसेच हरित ऊर्जा क्षेत्रात देश दैदिप्यमान प्रगती करीत आहे. त्यामुळे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था केवळ ५ ट्रिलियन डॉलर इतकीच नाही १० ट्रिलियन डॉलरदेखील होऊ शकते, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

कौटुंबिक व्यवसायातील नव्या पिढीतील उद्योजकांच्या २५ परिणामकारक कथा असलेल्या दत्ता जोशी यांच्या पुस्तकाचे साहित्यमूल्य फार मोठे आहे. स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईल त्यावर्षी किमान २५००० युवा उद्योजकांच्या यशोगाथा लिहिल्या जातील असा विश्वास मराठवाडा विभागाचे सीआयआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content