Homeएनसर्कल169पैकी 154 मते मिळवत...

169पैकी 154 मते मिळवत भारताची आयएमओ परिषदेवर फेरनिवड

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी ‘ब’मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले.

केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले मोठे समर्थन असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीकच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे. यात 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित झाल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदरप्रणित विकास आणि सागरी सुरक्षा यावरील चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. त्याचे फलित या निवडणुकीत मिळाले.

आयएमओमध्ये भारताचे महत्त्व वाढत असून सलग दुसऱ्या कार्यकाळात देशाने ब श्रेणीमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. अधिकाऱ्यांनी या कामगिरीचे वर्णन अमृतकाल सागरी व्हिजन 2047ला गती देण्यासाठी हा एक मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सागरी केंद्रात रूपांतरित करण्यासाठी हा दीर्घकालीन आराखडा आहे. या उपक्रमाला  मोदी स्वतः मार्गदर्शन करत असून सोनोवाल यांच्यासह बंदरे आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर त्याचे नेतृत्त्व करत आहेत.

आयएमओ परिषदेत निवडून आलेले 40 सदस्यदेश आहेत जे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. असेंब्लीदरम्यान भारतीय शिष्टमंडळाने अनेक देश, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना आणि आयएमओ अधिकाऱ्यांसोबत सागरी सुरक्षा, सागरी डिजिटलायझेशन, हरित नौवहन, नाविकांचे कल्याण आणि बंदर विकासात भागिदारी वाढवण्यासाठी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठका घेतल्या. भारताव्यतिरिक्त, आयएमओ असेंब्लीने ब श्रेणीमध्ये काम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 सदस्य देशांना निवडले आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांचा समावेश आहे.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content