डिजिटल परिवर्तनासाठी, व्यापक स्तरावर डिजिटल उपाययोजना सामाईक करण्याच्या क्षेत्रात, सहकार्य करण्याबाबत, भारत आणि क्युबा यांच्यातील सामंजस्य कराराला नवी दिल्लीत नुकतीच मंजुरी देण्यात आली.

भारताच्या बाजूने माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एस. कृष्णन आणि क्युबाच्या बाजूने दूरसंचार विभागाचे उपमंत्री विल्फ्रेडो गोन्झालेझ विडाल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांच्या डिजिटल व्यवस्थांना परस्पर लाभ मिळवून देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण आणि इतर सहयोगी उपक्रमांद्वारे डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

क्युबामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा सहजपणे अंगीकार केला जावा, यासाठी, डिजिटल परिवर्तनाबाबत, विकास भागीदारी निर्माण करून, भारत क्युबाला सहकार्य करेल.