Homeपब्लिक फिगरगद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला...

गद्दारांसमोर अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जायचे नव्हते!

ज्या पक्षाने सर्व काही दिलं त्या पक्षाशी गद्दारी करून माझ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणाऱ्या गद्दारांसमोर मला जायचे नव्हते म्हणून नेतिकतेच्या कारणावरून आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे यांनी आज माध्यमांना सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे समाधान झाले. देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, असा प्रश्न होता. सत्तेसाठी हपापलेले लोक जे उघडेनागडे राजकारण करत होती त्याची चिरफाड सर्वोच्च न्यायालयाने केली. राज्यपालांची भूमिकाही अयोग्य होती. त्याचे वस्त्रहरण या निकालात करण्यात आले. राज्यपाल नावाची जी यंत्रणा आहे ती आतापर्यंत एक आदरयुक्त यंत्रणा होती. मात्र शासनकर्ते या यंत्रणेचे जे धिंदवडे काढतात ते लक्षात घेता ही यंत्रणा यापुढे अस्तित्त्वात ठेवावी की नाही हा विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे न्यायालयाने सोपवला आहे. मात्र त्यावेळचा पक्ष म्हणजे माझी शिवसेना यांच्या पक्षादेशाचा विचार त्यांना करावाच लागेल. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह राहील. आता लढायला सुरुवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यासाठी इथे आले आहेत. आम्हाला देशाला वाचवायचे आहे. संविधानाला वाचवायचे आहे. देशाला पुन्हा गुलाम बनवणाऱ्या प्रवृत्तींना घरी पाठवायचे आहे. याकरीता सर्व पक्ष, सर्व लोकांना एकत्र करण्याचे काम आम्ही सुरू केलेले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

नितीश कुमार यांनी याला दुजोरा देताना जास्तीतजास्त राजकीय पक्षांनी एकत्र यावे आणि त्यांची एकजूट कायम राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे एक पाऊल म्हणूनच आम्ही येथे आलो आहोत, असे यावेळी सांगितले.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content