Homeटॉप स्टोरीअजितदादांचं घर आहे...

अजितदादांचं घर आहे पत्नीच्या नावे..

लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाण असलेल्या महिलांना खूष करणारा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गृहस्वामिनीला खऱ्या अर्थाने घराची मालकीण बनवणारी योजना आणलीय आणि या प्रतिनिधीच्या प्रशानाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमचं घर आधीच पत्नीच्या नावावर आहे.

नवीन घर घेताना घराची नोंदणी गृहस्वामिनीच्या नावानं केली, किंवा गृहस्वामिनी, कन्या किंवा सासू यांच्या नावानं केली तर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना पवार यांनी जाहीर केलीय. नवीन घर एकट्या महिलेच्या नावावर, महिला तसंच मुलगी किंवा महिला आणि सासू यांच्या नावावर असावे तरच मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळू शकेल, हे आदेशात आपण नमूद करू आणि एक एप्रिलपासून राज्यात ही योजना लागू करू, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

अर्थसंकल्प सादर करताना आजचा दिवस ८ मार्चचा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, असं सांगून पवार म्हणाले की, शुभशकुनांचं तोरण तू.. देव्हाऱ्यातले चंदन तू.. नवनिर्मितीची गाथा जिथे.. आपण सर्वांनी टेकावा माथा..

अशा शब्दांत महिलांचं वर्णन करून त्यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर केली. महिलांना घर नावावर मिळण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या या योजनेबरोबरच पवार यांनी ग्रामीण भागातल्या मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बसप्रवासाची सोयही केलीय आणि त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर करत यासाठी दीड हजार बसगाड्यांची सोयही सरकार करणार आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्योगिनी योजनेतून दहा हजार महिला बचत गटातल्या महिलांना लाभ होईल. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणाची संधी उपलब्ध करून देणार आहे. महिला दिनानिमित्ताने स्वतंत्र महिला गट राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्याची घोषणा करतो, असंही पवार यांनी जाहीर केलं.

कोरोनाचा महाराष्ट्राला ७० हजार कोटीचा फटका

मुंबईसह राज्याला आणि देशासह संपूर्ण जगाला भेडसावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राला सत्तार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पातून ही गोष्ट समोर आली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना महसुली जमा साडेतीन लाख कोटी रुपयांची अपेक्षित होती. पण कोरोनामुळे ती केवळ दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचीच होऊ शकल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यामुळे करोनामुळे महसुली जमेमध्ये सत्तर हजार कोटींचा फटका बसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकराच्या परताव्यापोटी केंद्र सरकारकडून तीस हजार कोटी रुपये येत्या ३१ मार्चपर्यंत येणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले. केंद्राकडून हे तीस हजार कोटी रुपये येत्या महिनाभरापर्यंत येतील, असं वाटत नाही, हे सांगून महसुली तूट एक लाख कोटीपर्यंत जाईल, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

रडगाणं न गाता राज्य पुढे – मुख्यमंत्री

कोणत्याही प्रकारचं रडगाणं न गाता आर्थिक संकटाचा सामना करत समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला म्हणून मी अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content