Homeटॉप स्टोरीकोरोना रूग्णांसाठी आता...

कोरोना रूग्णांसाठी आता उपचारांचे घरगुती पॅकेज!

कोविडच्या (कोरोना) वाढत्या रूग्णसंख्येकडे पाहता रूग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यासाठी आता विविध रूग्णालयांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. सरकारी वा खाजगी रूग्णालयांमध्येही खाटा मिळत नसल्यामुळे अनेक रूग्णांची उपचारांअभावी आबाळ होते. अशावेळी ज्यांच्याकडे खर्च करण्याची ऐपत आहे, अशा रूग्णांना त्यांच्याच घरी उपचार करण्याचे पॅकेज या रूग्णालयांनी जाहीर केले आहे.

चार दिवसांपूर्वीच नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन कोविडच्या रूग्णांवर उपचार करण्याचे पॅकेज जाहीर केले आहे. १५ दिवसांचे हे पॅकेज ३३३ रूपये प्रतिदिन, या दरापासून सुरू होत आहे. या पॅकेजमध्ये दर तिसऱ्या दिवशी डॉक्टर टेलिफोनवर रूग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेणार. दिवसातून दोन वेळा प्रशिक्षित नर्सकडून टेलिफोनवरून लक्ष देणार. नर्सकडून नियमित आढावा घेतला जाणार. रूग्णाला स्वतःची पडताळणी कशी करावी, विलगीकरणात कसे राहवे, तेथील स्वच्छता कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन करणार. घरी औषधे पाठवणार. आरटीपीसीआर चाचण्यांसाठी घरून नमुने गोळा करणार. कोविड-१९चे वैद्यकीय किट (डिजीटल थर्मोमीटरसह) आणि रक्तदाब तपासण्याचे यंत्र देणे आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, घरी येऊन कोविड चाचणीसाठी नमुने गोळा करण्याची सेवाही आता काही प्रयोगशाळांनी सुरू केली आहे. याबाबतच्या जाहिराती समाजमाध्यमांवर येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे ज्यांच्याकडे खर्च करण्याची ऐपत आहे आणि ज्यांना सौम्य स्वरूपाचा कोरोना आहे त्यांनी रूग्णालयांऐवजी रूग्णालयाच्या या घरगुती सेवेचा उपयोग करून घ्यायला हरकत नसावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content