Homeकल्चर +चित्रसृष्टीतल्या मान्यवरांचा राज्यपालांकडून...

चित्रसृष्टीतल्या मान्यवरांचा राज्यपालांकडून गौरव!

नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने चित्रसृष्टीतल्या मान्यवरांचा ‘मेड इन इंडिया आयकन्स: महाराष्ट्र सन्मान’ देऊन मंगळवारी (दि. २०) राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक कुमार शानू, उदित नारायण, भजनसम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलीया यांसह विविध क्षेत्रातील ४२ व्यक्तींना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार  प्रदान करण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव व स्वप्नील जोशी यांचाही यात समावेश होता. नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेचे अध्यक्ष संदीप घुगे व्यासपीठावर उपस्थित होते.

भारत ही ‘बहुरत्ना वसुंधरा’ असून या देशात वेळोवेळी प्रतिभासंपन्न व्यक्ती निर्माण झाल्या आहेत. पोर्तुगिझ, ब्रिटीश, मुघल आदी परकीय आक्रमकांच्या काळातदेखील या देशातील प्रतिभा तसूभरही कमी झाली नाही. प्रतिभासंपन्न व्यक्तींनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केल्यास देश अधिक प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content