Sunday, April 27, 2025
Homeब्लॅक अँड व्हाईटगोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो...

गोव्यातल्या पासपोर्टसाठीच्या अर्जदारांनो सोमवारी भेटीच्या वेळा बदला..

केंद्र सरकारने सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर केलेल्या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्जदारांना त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याची विनंती केली आहे.

केंद्र सरकारची सर्व कार्यालये 22 जानेवारी 2024 रोजी अडीच वाजेपर्यंत अर्ध्या दिवसासाठी बंद राहतील. हे लक्षात घेऊन, गोव्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने पारपत्र अर्जदारांना विनंती केली आहे ज्यांनी 22 जानेवारी 2024 (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) पणजीतील पारपत्र सेवा केंद्र आणि मडगाव येथील पोस्ट ऑफिस पारपत्र  सेवा केंद्र येथे पारपत्रासाठी भेटीची वेळ निश्चित केली आहे त्यांनी त्यांच्या ठरलेल्या भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित कराव्या, अशी  विनंती केली आहे. भेटीच्या वेळेचे पुनर्निर्धारण अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करून किंवा एमपासपोर्ट सेवा मोबाइल ॲप वापरून केले जाऊ शकते.

प्रभावित अर्जदारांच्या सोय सुनिश्चित करण्यासाठी या सुट्टीमुळे ज्यांच्या भेटी रद्द झाल्या आहेत त्यांच्यासाठी अतिरिक्त भेटीचा प्रयत्न उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींना भेटीच्या वेळा पुनर्निर्धारित करण्याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएसद्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content