Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज एकीकडे पाण्याचा तर दुसरीकडे शब्दांचा मारा!

बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून हल्लाबोल, हा टास्क सुरू आहे. टीम ए आणि टीम बीमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही टीममधले सदस्य प्रामाणिकपणे मेहनत घेताना दिसत आहेत.

आज मोटर बाईकवर बसायला येणार आहेत जय आणि गायत्री. आता विरुद्ध टीम, जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार यात शंका नाही. बघूया हा टास्क कसा रंगणार? जय आणि गायत्री किती वेळ मोटार बाईकवर बसू शकतील? विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात यशस्वी होतील?

विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाचं पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये ही टीम अजून कुठल्याकुठल्या प्रकारचे प्रयत्न करणार हे बघायला रंजक ठरेल.

टास्कदरम्यान अक्षय आणि विशालमध्ये पडणार आहे वादाची ठिणगी. अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने विशाल आणि अक्षयमध्ये होणार आहे बाचाबाची.. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत..”. आता हा वाद कुठे थांबणार? पुढे काय होणार? बघूया आजच्या भागात..

हल्लाबोल टास्कमुळे खूपच तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. सदस्यांचा शब्दांचा मारा ऐकायला येत आहे. पण, दादुस म्हणजेच संतोष चौधरी घरातील वातावरण हलकंफुलकं करण्याचं काम सुरुवातीपासून करत आहेत. कधी हसू आणतात, तर कधी डोळ्यात पाणी..

आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे यमकाची जुगलबंदी. त्याची सुरुवात आविष्कारपासून झाली. आविष्कारने मायक्रोवेव्हमध्ये अंडी उकाडायला ठेवली. पण त्यात पाणीच ठेवायला विसरला म्हणे.. त्यावरून दादूस यांची वाक्य सुरू झाली..

“आविष्कारने केला अंड्याचा ब्लास्ट, हा त्याचा चान्स होता लास्ट”

त्यावर मग तृप्ती देसाईदेखील म्हणाल्या, “पण, मीनल आणि सोनाली करते आहे काम फास्ट”.

दादुस लगेच म्हणाले, “यमक हीच तुमच्या लाईफची चमक”..

त्यावर मग सोनालीनेदेखील करते वाक्य “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक”.

तृप्तीताईंना लगेच टास्कमधलं काहीतरी आठवलं असणार.

त्या म्हणाल्या “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक”?

आणि असे अनेक यमक सदस्य जुळवत केले. ही जुगलबंदी दादुस, तृप्ती देसाई,  मीनल, सोनाली, आविष्कार या सदस्यांमध्ये रंगतेय.

पुढे काय होते ते पाहुया बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात. आज रात्री.. कलर्स मराठीवर..

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content