Homeन्यूज ॲट अ ग्लांसबिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण केल्या असून ते आता आपल्या संबंधित मतदारसंघांमध्ये परतले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तसेच 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. घटनेतल्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951च्या कलम 20ब अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करतो. निवडणूक आयोगाने निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बारकाईने पाहण्याचे आणि निवडणुका पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

निरीक्षकांना सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्याशी पूर्णतः संपर्कात राहण्याचे व त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निरीक्षकांना मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने घेतलेल्या नव्या उपक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content