Homeकल्चर +उद्या अनुभवा ना....

उद्या अनुभवा ना. धों. महानोरांचे साहित्य संचित!

मुंबईच्या विश्वभरारी फाउंडेशन आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साठ्ये महाविद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी साडे दहा वाजता रानकवी ना. धों. महानोर यांच्या साहित्यावर आधारित ‘महानोरांचे साहित्य संचित’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये ना. धों. महानोर यांच्या गाजलेल्या कविता, रानगाणी, त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या संपर्कातील मान्यवरांच्या आठवणी यामधून त्यांना आदरांजली वाहिली जाईल.

याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे आपल्या कवी, गायक, वादक साथीदारांसह महानोरांच्या काही कविता आणि गाणी सादर करतील. प्रमुख वक्ते म्हणून पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, कवी-लेखक रवींद्र

आवटी, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे,  डॉ. कृष्णा नाईक,  कवी-अभिनेता प्रकाश राणे, गुरुनाथ तेंडुलकर, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, संपदा पाडगावकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, असे विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापिका लता गुठे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समीर जाधव करतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content