Homeटॉप स्टोरीदेशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक...

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यामुळे सामान्य राहण्यास मदत मिळेल, असा सरकारला विश्वास आहे. दरम्यान, सध्याच्या स्थितीत घरी देण्यात येणारा सीएनजी तसेच पीएनजी गॅसच्या पुरवठ्यात कोणतीही कपात केली नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

आखातातल्या युद्धामुळे देशात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर तसेच गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. भारतातल्या तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅसपुरवठ्यावर दोन दिवसांपूर्वीच निर्बंध लादले आहेत. व्यावसायिक सिलींडरसाठी होणारी नवी मागणी पुढील सूचनेपर्यंत नोंदवू नये, अशा सूचना कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना दिल्या आहेत. घरगुती गॅसच्या

अत्यावश्यक

उपभोक्त्यांना मात्र हिंदुस्तान पेट्रोलियम तसेच भारत पेट्रोलियमसारख्या कंपन्यांकडून एसएमएस पाठवून गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून चिंता करण्याची कोणतीही गरज नसल्याचे कळविले आहे. दरम्यान, व्यावसायिक सिलींडर उपलब्ध होत नसल्याने पुण्यात गॅसवर चालणाऱ्या १८ शवदाहिन्या तात्पुरत्या बंद करण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. मुंबई, पुणेसारख्या अनेक शहरांमध्ये गॅसपुरवठा नसल्यामुळे साधारण २५ टक्के हॉटेल बंद ठेवण्यात आली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज दहा दिवसांनंतरही आखातात इराणवरील लष्करी कारवाई सुरू असून इराण त्याला तोडीसतोड उत्तर देत आहे. इराणने आसपासच्या युएई, कुवेत, बाहरीन, जॉर्डन आदी देशांमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर तसेच दूतावासांवर हल्ले चालूच ठेवले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जवळजवळ संपवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात मात्र आखातातल्या आपल्या नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. हे युद्ध लवकरच संपेल असे ट्रम्प यांनी म्हणताच इराणने ते कधी संपवायचे ते आम्ही ठरवू, असे आव्हान दिले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content