Homeब्लॅक अँड व्हाईटईपीएफओने ऑगस्टमध्ये जोडले...

ईपीएफओने ऑगस्टमध्ये जोडले 17 लाख नवे सदस्य! 

ईपीएफओच्या नव्याने प्रसिद्ध झालेल्या वेतनश्रेणीच्या माहिती नुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी​​ संघटनेने (ईपीएफओ) ​​ऑगस्ट, 2023 मध्ये एकूण 16.99 लाख सदस्यांची नव्याने नोंद केली. वेतन दरांच्या संदर्भात वर्ष-दर-वर्षाची तुलना केली असता 2022 या मागील वर्षाच्या, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत एकूण सदस्यांच्या नोंदणी मध्ये किरकोळ वाढ झालेली दिसते. उपलब्ध नव्या माहिती नुसार, 3,210 आस्थापनांनी इलेक्ट्रॉनिक चलान कम रिटर्न (ECR) चा पहिला हप्ता भरून आपल्या कर्मचार्‍यांना ईपीएफओ (EPFO) ​​चे सामाजिक सुरक्षा कवच मिळवून दिले आहे.

या संदर्भातली आकडेवारी हे दर्शवते की, ऑगस्ट, 2023 महिन्यात ईपीएफओ ने सुमारे 9.26 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या या सदस्यांमध्ये, 18-25 वर्षे वयोगटातील सदस्य या महिन्यात जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी 58.36% आहेत. यावरून हे सूचित होते की, प्रथमच नोकरी शोधणारे बहुतेक तरुण हे संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये मोठ्या संख्येने समाविष्ट होत आहेत.

वेतना संदर्भातला माहिती असे दर्शविते की, अंदाजे 11.88 लाख सदस्य ईपीएफओ ​​मधून बाहेर पडले आणि पुन्हा समाविष्ट झाले, जी 2022 या मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 10.13% ची वाढ दर्शविते. या सदस्यांनी आपल्या नोकऱ्या बदलल्या आणि ईपीएफओ ​​अंतर्गत समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा सहभागी झाले तसेच या कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी बदलताना अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी आपले संचय हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला आणि अशा प्रकारे, त्यांनी आपल्याला सामाजिक सुरक्षा संरक्षणाचा फायदा मिळवून घेतला.

ही माहिती असेही सूचित करतो की, ईपीएफओ सुविधेमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांची संख्या गेल्या दोन महिन्यांत सातत्याने कमी होत आहे. वेतना संदर्भात उपलब्ध डेटाचे लिंगनिहाय विश्लेषण केली असता असे दिसून येते की, या महिन्यादरम्यान नोंदणी झालेल्या एकूण 9.26 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 2.44 लाख महिला सदस्य आहेत, जे पहिल्यांदाच ईपीएफओ ​​मध्ये समाविष्ट झाले आहेत. तसेच, या महिन्यात निव्वळ महिला सदस्यांच्या वाढीचा वाटा सुमारे 3.43 लाख इतका होता.

वेतनश्रेणी डेटाचे राज्यवार विश्लेषण असे दर्शविते की, निव्वळ सदस्य वाढीच्या बाबतीत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा आणि गुजरात ही शीर्ष 5 राज्ये आहेत. या राज्यांनी या महिन्यात एकत्रितपणे 9.96 लाख सदस्यांची नोंदणी केली जी एकूण सदस्यांच्या वाढीच्या तुलनेत सुमारे 58.64% आहे.

संपूर्ण भारतातला उद्योग-निहाय माहिती विचारात घेतली तर, व्यापार-व्यावसायिक आस्थापना, इमारत आणि बांधकाम, अभियंता-अभियांत्रिकी कंत्राटदार, कापड इ. उद्योगांमध्ये जास्तीत जास्त सदस्यत्व नोंदणी झालेली दिसते. एकूण निव्वळ सदस्यत्वापैकी सुमारे 39.87% नोंदणी ही कुशल सेवांमधून आलेले दिसतात. (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सामान्य कंत्राटदार यांचा समावेश असलेल्या विविध सेवा, सुरक्षा सेवा, विविध उपक्रम इत्यादी सह).

वरील वेतनश्रेणी संदर्भातली माहिती तात्पुरती आहे, कारण माहिती डेटा निर्मिती ही एक सततची प्रक्रिया आहे, तसेच कर्मचाऱ्यांसंबंधीची माहिती अद्ययावत करणे ही एक सततची प्रक्रिया आहे.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content