HomeUncategorizedरविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, दि. १६ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता कल्याणी साळुंके यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना अभय दातार तबल्याची आणि अनंत जोशी संवादिनीची साथ करतील. हा कार्यक्रम पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आयोजित केला असून अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

कल्याणी साळुंके, या ग्वाल्हेर-आग्रा घराण्याच्या गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे घेतलं. त्यानंतर पं. वसंतराव कुळकर्णी व डॅा. अशोक रानडे यांच्याकडे तालीम घेतली. डॅा. अरूण द्रविड यांचं मार्गदर्शनही त्यांनी घेतलं. त्या शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. आकाशवाणीच्या त्या अ दर्जाच्या कलाकार आहेत. डॅा. अशोक रानडे यांच्याकडून त्यांनी ‘आवाज जोपासना शास्त्राचे’ शास्त्रशुद्ध मार्गदर्शन घेतले आहे. त्या स्वतःही याचे मार्गदर्शन विविध कार्यशाळांमधून करत असतात. त्यांना ठाणे भूषण पं. राम मराठे पुरस्कार तसेच अन्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Continue reading

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...

मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

मुंबईतल्या आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे एमएससी बँक पुरस्कृत मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला. अटीतटीच्या अंतिम आठव्या फेरीत डावाच्या मध्यापर्यंत १०-० अशी आघाडी घेणाऱ्या उमैर पठाणला...
Skip to content